मकाचे दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Maize Prices Fall : मकाचे दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला

मोजक्यात व्यापाऱ्यांचा सहभाग, बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको

पुढारी वृत्तसेवा

Angry farmers shut down auction as maize prices fall

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून मोजक्याच व्यापाऱ्यांनी मकाच्या लिलावात सहभाग घेतल्यामुळे मकाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. केवळ १,००० ते १,३०० रुपये या दरम्यानच भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. २६) दुपारच्या सत्रातील मका लिलाव अचानक बंद पाडला.

तसेच मकाने भरलेल्या काही ट्रॅक्टर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर कन्नड-चाळीसगाव रोडवर आडव्या उभ्या करून शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. रास्ता रोको यावर्षी तालुक्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात मकाची लागवड झाल्याने बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सोमवार वगळता दररोज दोन सत्रांत लिलाव होतो. मात्र गेल्या काही दिवसांत फक्त पाचसहा व्यापाऱ्यांचाच सहभाग पहायला मिळत असल्याने मकाला उचित दर मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या निषेधार्थ लिलाव बंद करण्यात आला.

लिलाव बंद करताच संतप्त शेतकऱ्यांनी मकाने भरलेल्या ट्रॅक्टर कन्नड-चाळीसगाव रस्त्यावर उभ्या केल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक टी. पी. पवार तथा सहायक फौजदार नासेर पठाण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत ट्रॅक्टर तेथून बाजार समितीच्या आवारात आणले आणि वाहतूक सुरळीत केली.

शेतकऱ्यांनी पोलिसांना बोलवा असा ठाम पवित्रा घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक रंगराव सानप तातडीने बाजार समितीत दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत दुपारचे सत्र सुरू करण्यात आले. २१ ममावचरफ असलेल्या मकाला तब्बल १३ रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाल्याची माहिती आहे.

केंद्र सरकारने मक्यासाठी २,४०० रुपये प्रति क्विटल शासकीय दर जाहीर केला असतानाही येथे फक्त १,००० ते १,३०० रुपयेच दर मिळत आहेत. म्हणूनच आम्ही लिलाव बंद पाडला.
- नितीन बारगळ, शेतकरी
मकाचे दर हे मावचर, डागी, बिनडागी यावर अवलंबून ठरतात. ज्या शेतकऱ्यांच्या मकाचे मावचर १३ ते १४ असेल, त्यांना निश्चितच दोन हजार व ऐकवींशे रुपये दर मिळतो आहे.
मनोज राठोड, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कन्नड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT