An inspiring lecture on the 'Hind Di Chadar' initiative was held at the Municipal Priyadarshini School
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, प्रियदर्शनी शाळेत मार्गदर्शनपर व्याख्यानाचे मंगळवारी (दि. २८) आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गुरुदेव सिंग ऊर्फ रोमिसिंग छाबडा व हरप्रीतकौर छाबडा यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी (बलिदान) समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने हिंद दी चादर हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री गुरु तेग बहादूरजींना हिंद दी चादर-हिंदुस्थानाची ढाल व रक्षणकर्ता, असे संबोधले जाते. काश्मिरी पंडितांसह सर्व धर्मांच्या लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्य व मानवी हक्कांसाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान हे देशातील LINGEN MEPPTRका छत्रपती संभाजीनगर सहिष्णुता, एकता व धर्मरक्षणाचे प्रतीक असल्याचे छाबडा दाम्पत्याने स्पष्ट केले.
दरम्यान, नांदेड येथील मोदी मैदानावर ५२ एकर क्षेत्रात २४ व २५ जानेवारी रोजी पार पडलेल्या दोनदिवसीय भव्य धार्मिक-सांस्कृतिक सोहळ्याची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे संचालन रश्मी होनमुटे यांनी केले, तर तेजस्विनी देसले यांनी आभार मानले.