An inquiry will be conducted into 'that' Rs 26 crore water supply scheme in Chitegaon
चंद्रकांत अंबिलवादे :
पैठण पैठण तालुक्यातील बिलेगाव येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलस्वराज रप्पा क्र. २ पाणीपुरवठा २६ कोटी रुपयांची योजना राबविण्यात आल्याचा देखावा निर्माण करून सदरील योजना चितेगाव ग्रामपंचायत विभागाला हस्तंतरण झाल्याचे बनावट प्रकरणाची चौकशी तात्काळ करण्याचे आदेश आमदार विलासबापू भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी (दि.९) झालेल्या प्राधिकरण विभागाच्या बैठकीत दिले.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चितेगाव व बिडकीन परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक नगरी निर्माण झाल्याने या ठिकाणी हजारोंच्या संख्येना परांतीष व स्थानिक कामगार चितेगाव येथे वास्तव्यास असल्यामुळे तत्कालीन पालकमंत्री संदीपान चुमरे यांनी वितेगावसाठी स्वतंत्र वाधीष पाणीप स्वता योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलस्वराज टप्पा क्र. २ अंतर्गत २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या गालात पाणीपुरवठा योजना राबविण्याचे ठरवले, मात्र संबंधित अधिकारी व गुतेदाराच्या संगगमताने या योजनेचे पाणी वेथील नागरिकांना मिळणे तर दूरच परंतु सदरील योजना चानुमातूर पद्धतीने गुंडाळून ठेवली.
ही योजना पुढील देखभालीसाठी चितेगाव ग्रामपंचायत विभागाला हस्तंतरण झाल्याबाबतची लेखी माहिती चितेगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कृष्णा गिधाने, भाऊनारोन पाचारणे यांना देण्यात आली होती. सदरील साम्याचे सरपंच कृष्णा गिधाने यांनी योजना हस्तांतरण झाली नसल्याचा प्रकार प्राधिकरण विभागाचे अधिक्यों न जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पैठण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून बनावट हस्तांतरण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
सोमवारी प्राधिकरण विभागाच्या वतीने आमदार विलासबापू भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्राधिकरण विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, कार्यकारी अभियंता काळे, उपविभागीय अभियंता किरण पाटील, शाखा अभियंता मोरे गांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चितेगाव सरपंच कृष्णा गिधाने, माजी सरपंच भाऊसाहेब पाचारणे, विजय नरवडे, फिरोज सय्यद यांनी चिलेगाव ग्रामपंचायतीला बनावट पाणीपुरवठा योजना हस्तांतरण करण्यात आल्याची चौकशी करण्याची मागणी केल्यामुळे आमदार विलासबापू भुमरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तारक चौकशी करण्याचे आदेश देऊन प्राधिकरण विभागाच्या अंतर्गत पैठण शहरातील विविध प्रभागांतील अर्थवट अवस्थेत असलेले पाणीध रवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचा आदेश बैठकीत दिला आहे. या बैठकीला प्राधिकरण विभागाचे विविध अचिकारी-कर्मचारी तसेच पैडम तालुक्यातील विविध गानांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.