Akbaruddin Owaisi : एमआयएमचा महापौर करण्यासाठी एकत्र याF File Photo
छत्रपती संभाजीनगर

Akbaruddin Owaisi : एमआयएमचा महापौर करण्यासाठी एकत्र या

अकबरुद्दीन ओवैसी यांचे आवाहन, बांगलादेशमधील घटनेचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

Akbaruddin Owaisi: Come together to make AIMIM mayor

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात भाजपने शिवसेना तोडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन पक्ष केले. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच शरद पवार आणि अजित पवार एक होऊ शकतात, तर एमआयएम मधील नाराज त्यांची नार-ाजी दूर करून एक होऊ शकत नाही काय ? या महापालिका निवडणुकीत सर्वांनी एकत्र होऊन शहराचा महापौर एमआयएमचा करावा, असे आवाहन एमआयएम नेते, आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी रविवारी (दि.११) येथे केले. त्यासोबतच त्यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला.

यावेळी एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह हैदराबाद येथील पक्ष नेत्यांची उपस्थिती होती. शहरात एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी दिवसभर ओवैसी यांच्या शहराच्या विविध भागात बैठका, रॅली झाल्या. त्यानंतर सायंकाळी आमखास मैदानात सभा झाली. ते म्हणाले, की मुस्लिम समाजामध्ये गेल्या काही वर्षात बेर-ोजगारी वाढलेली आहे.

त्यांना कर्ज मिळत नाही. उच्च शिक्षणात मुस्लिम समाजाची टक्केवारी खूपच कमी आहे. अशी परिस्थिती मुस्लिम समाजासह समाजामध्येही आहे. मागासवर्गीय या चक्रातून बाहेर येण्यासाठी गरज सर्वांनी एक होण्याची आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशात बिफ, दाढी, तसेच हिजाबच्या नावाने घडलेल्या घटनांमध्ये अल्पसंख्यांक समाजाला टार्गेट करण्यात आले, अशा सर्व घटनांचा अकबरूद्दीन ओ वेसी यांनी निषेध केला. यासह बांगलादेशात सनातन हिंदू बांधवांसोबत अत्याचाराच्या घटनांचाही ओवेसी यांनी निषेध करून कोणत्याही ठिकाणी गरीब, अल्पसंख्यांकावर अत्याचाराच्या घटना होऊ नयेत, असे ओवेसी यांनी नमूद केले.

लोकशाहीसाठी १५ मिनिटे काढा

अकबरूद्दीन ओवेसी यांनी मतदानाची तारीख विचारली आणि मतदानाच्या दिवशी फक्त १५ मिनिट काढून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जा आणि लोकशाही मजबूत करा, असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT