Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime : दोन दिवसांत तीन जुगार अड्यांवर छापा

४६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

अजिंठा : अजिंठा पोलिसांनी सिल्लोड तालुक्यातील पानवडोद बुद्रुक व गोळेगाव परिसरात जुगार अड्ड्यांविरुद्ध धडक मोहीम राबवत दोन दिवसांत तीन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना आढळून आलेल्या ४६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

तिन्ही कारवायांमध्ये रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी व जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ७० हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात ७३ हजार ६१० रुपये रोख रकमेचा समावेश आहे.

पानवडोद बुद्रुक शिवारातील अन्वा रोडवरील गजानन रमेश दौड यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सोमवारी (दि. १७) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये जुगार खेळताना एकूण २६ जण आढळून आले.

पहिल्या कारवाईत १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून १ लाख ५० हजार ३०० रुपयांचा, तर दुसऱ्या कारवाईत १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून १ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असून, यात ३३ हजार ५०० रुपये रोख रक्कम आहे. पहिल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब किसन भवर, तर दुसऱ्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर मधुकर इंगळे यांनी फिर्याद दिली.

तिसरी कारवाई गोळेगाव येथे रखमाजी नामदेव गव्हाणे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडला लागून असलेल्या मोकळ्या जागेत सोमवारी (दि.१७) सायंकाळी करण्यात आली. येथे जुगार खेळताना २० जण आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत २ लाख ४५ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यात ४० हजार ११० रुपये रोख आणि सुमारे २ लाख ५ हजार रुपयांचे मोबाईल व जुगाराचे साहित्य आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी रमेश तुळशिराम काजळे यांनी फिर्याद दिली असून, सोमवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

या तिन्ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल नीलेश सिरसकर व हेड कॉन्स्टेबल मंगेश आरके पुढील तपास करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT