फर्दापूर : अजिंठा लेणीत माधमांशांनी हल्ला करताच पर्यटकांनी कपड्यांनी स्वत:ला झाकून घेत जागा मिळेल तिथे बसून मधमाशा शांत होण्याची प्रतीक्षा केली. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Ajanta Caves bee attack : अजिंठा लेणीत सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांचा हल्ला; 90 पर्यटक जखमी

दोन महिन्यांत सातव्यांदा प्रकार, प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

फर्दापूर : जागतिक वारसास्थळ अजिंठा लेणीत शुक्रवारी (दि.3) मधमाशांनी पुन्हा एकदा पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन विदेशी पर्यटकांसह जवळपास 90 पर्यटक जखमी झाले.

याच ठिकाणी गुरुवारी (दि.2) झालेल्या मोठ्या हल्ल्यात तब्बल 82 पर्यटक जखमी झाले होते. दोन महिन्यात सातव्यांदा असा प्रकार घडल्याने अजिंठा लेण्यांमधील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास लेणी क्रमांक 26 जवळ अचानक मधमाशा आक्रमक झाल्या आणि त्यांनी पर्यटकांवर हल्ला चढविला. काही क्षणांतच परिसरात गोंधळ उडाला आणि पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. प्रशासनाने तत्काळ संबंधित भाग बंद करून पर्यटकांची वर्दळ थांबवली.मधमाशा शांत झाल्या नंतर पर्यटकांना पुन्हा लेणीत सोडण्यात आले.

मात्र पहिल्या हल्ल्यानंतर लेणी क्रमांक 9 व 10 च्या परिसरातही मधमाशा पुन्हा आक्रमक झाल्या आणि दुपारनंतर दिवसभर थोडया-थोडया वेळाने मधमाशांकडून हल्ले सुरूच राहिले.त्यामुळे अनेक पर्यटकांनी लेणी न पाहताच माघार घेतल्याचे चित्र दिसून आले. तर जखमी पर्यटकांनी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले असून सुदैवाने कोणतीही मोठी हानी झालेली नाही.

सुरक्षारक्षकांचा तत्पर प्रतिसाद

घटनेनंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांनी तत्परता दाखवत पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT