Ajanta News ... अखेर अजिंठा ग्रा.पं.ला आली जाग  File photo
छत्रपती संभाजीनगर

Ajanta News ... अखेर अजिंठा ग्रा.पं.ला आली जाग

दै. 'पुढारी'च्या बातमीनंतर बसविले नवीन व्हॉल्व्ह, गावातील पाणीपुरवठा सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

After the news of 'Pudhari', new valves were installed, water supply in the village is smooth

अजिंठा, पुढारी वृत्तसेवा

अनिठा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ड गेल्या काही महिन्यांपासून फुटला होता. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असे. यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल सुरू होते. याबाबत दै. पुढारीने शनिवार दि. ७ रोजी सविस्तर बातमी प्रकाशित करताच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले, शनिवारी दुपारी ४ वाजता तातडीने नवीन व्हॉल्व्ह बसवून गावातीत पाणीपुरवठा सुरळीत केला.

तीस हजार लोकसंख्या असलेल्या अजिंठा गावाला अजिंठा अंधारील प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येती. गावात सहा वॉर्ड आहेत. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गावातील पाणीटंचाईतर बाराही महिने पाठ सोडत नाही. अनेक वेळा पाईपलाईन फुटून पाण्याची नासाडी होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अनाड रस्त्यावरील देवीचा मळा परिसरात पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणावर पाणी बागा गेले आहे.

यामुळे प्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात आणि आता पावसाळ्यातसुध्दा नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याविना ग्रामस्थांचे होत असलेले हाल चपता दै. पुढारीने ७जून रोजी अजिंठ्याचा पाणीपुरवठा पुन्हा ठप्प या मथळ्याखाली सकाळी बातमी प्रकाशित करताच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले.

दुपारी ४ वाजता ग्रामपंचायतने अनाड सत्यावरील फुटलेला व्हॉलव्हची दुरुस्ती केली. यामुळे पाण्याची नासाडी थांबली आहे. यामुळे गावातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्‍त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT