सहा वर्षांच्या प्रशासकराजनंतर मनपात पुन्हा लोकप्रतिनिधींचे पर्व File Photo
छत्रपती संभाजीनगर

सहा वर्षांच्या प्रशासकराजनंतर मनपात पुन्हा लोकप्रतिनिधींचे पर्व

नवनिर्वाचित महापौरांच्या स्वागतासाठी चौपदार सज्ज : सभागृहात नवा गाऊन, नवीन राजदंड

पुढारी वृत्तसेवा

After six years of administrative rule, the Municipal Corporation once again has the opportunity to have representatives

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या कारभाराला सुरुवात होत असून, येत्या १० फेब्रुवारी रोजी शहराला नवा महापौर लाभणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, नव्या प्रशासकीय इमारतीतील अत्याधुनिक सभागृहात होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी चौपदारही शिस्तबद्ध रूपात सज्ज झाला आहे.

तत्कालीन नगरसेवकांचा २८ एप्रिल २०२० रोजी कार्यकाळ संपल्यानंतर महालिकेचा कारभार प्रशासकांकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत नवे नगर-सेवक निवडून आले आहेत.

बहुमत असलेल्या भाजपकडून सत्ता स्थापनाच्या जोरदार हालचाली सुरू आहे. येत्या १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडीसाठी प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. महापौरांसाठी नवीन गाऊन, नवीन राजदंड तयार करण्यात आला असून, चौपदारासाठीही नवीन गणवेश, टोपी, ब्लेड आदी साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे.

महापौर सहा वर्षांनंतर नव्या सभागृहात नवा महापौर निवडला जाणार असल्याने, महापालिका यंत्रणा आणि चौपदार दोघेही या ऐतिहासिक लोकशाही सोहळ्यासाठी पूर्णतः सज्ज झाले आहेत. दरम्यान महापालिकेच्या इतिहासात सर्वसाधारण सभेला अन्यसाधारण महत्त्व आहे.

महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या प्रत्येक सभेचा साक्षीदार आणि परंपरेचा वाहक म्हणून चौपदाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सध्या प्रकाश राजपूत है मनपा कर्मचारी चौपदार म्हणून कार्यरत असून, २०१८-१९ पासून ते ही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या आधी तब्बल ४० वर्षे सेवा बजावणारे चौपदार युनुस हे निवृत्त झाले आहेत.

आता राजदंड पळवणे अवघड

सर्वसाधारण सभेवेळी महापौरांच्या आसनाशेजारी ठेवला जाणारा राजदंड हा सत्तेचे व मानाचे प्रतीक मानला जातो. अनेकदा गोंधळाच्या वेळी विर-ोधकांकडून राजदंड पळवण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र आता राजदंडाभोवती काचेचे सुरक्षित कवच बसवण्यात आल्याने विरोधकांना आता राजदंड पळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT