सिडको बसस्थानकात मृत नवजात अर्भक टाकून जन्मदाती पसार

सिडको बसस्थानक परिसरात एका नवजात पाच महिन्यांच्या अर्भकाला उघड्यावर टाकून निर्दयी माता-पिता पसार झाल्याची घटना उघडकीस आली.
Newborn death
सिडको बसस्थानकात मृत नवजात अर्भक टाकून जन्मदाती पसारPudhari
Published on
Updated on

The mother abandoned her newborn dead baby at the CIDCO bus station and fled

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सिडको बसस्थानक परिसरात एका नवजात पाच महिन्यांच्या अर्भकाला उघड्यावर टाकून निर्दयी माता-पिता पसार झाल्याची घटना बुधवारी (दि.४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दुर्दैवाने, या अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, याप्रकरणी अज्ञातावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Newborn death
ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराकडे पाठ

पोलिस नियंत्रण कक्षाकडून एमआयडीसी सिडको पोलिसांना माहिती मिळाली की, सिडको बसस्थानक येथे एक अर्भक बेवारस अवस्थेत पडलेले आहे. डायल ११२ मार्शल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना तेथे एक नवजात अर्भक बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून अर्भकास चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी अर्भकाची तपासणी केली, मात्र दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यास मयत घोषित करण्यात आले. जन्म दिलेल्या अर्भकाची कोणतीही काळजी न घेता, त्यास उघड्यावर टाकून दिल्याने त्याचा जीव गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक फौजदार संजयकुमार साबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भरत पाचोळे करत आहेत.

Newborn death
भाजपच्या महापौरपदाचा उमेदवार आज ठरेल

साडीमध्ये गुंडाळून टाकले

सिडको बसस्थानकात कायम वर्दळ असते. बसस्थाकाच्या मागच्या बाजूला मोकळ्या मैदानात अडगळीत हे अर्भक साडीमध्ये गुंडाळून टाकले होते. हे अर्भक पुरुष जातीचे होते. गर्भपातानंतर त्याला कोणीतरी इथे टाकले असावे असा पोलिसांचा अंदाज असून सीसीटीव्हीची फुटेजवरून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news