बीडचे भूमिपुत्र ॲड. वसंतराव साळुंके सलग पाचव्यांदा विजयी file photo
छत्रपती संभाजीनगर

Bar Council of Maharashtra and Goa Member Elections : बीडचे भूमिपुत्र ॲड. वसंतराव साळुंके सलग पाचव्यांदा विजयी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूक

पुढारी वृत्तसेवा

Adv. Vasantrao Salunke, a son of the soil from Beed, wins for the fifth consecutive time

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा सदस्य निवडणुकीत बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अॅड. वसंतराव दिगंबररराव साळुंके सलग पाचव्यांदा यांनी विजयी होण्याचा विक्रम नोंदविला आहे. परिषदेच्या गेल्या ६५ वर्षांच्या इतिहासात सलग पाच वेळा विजयी होणारे ते पहिले आणि एकमेव सदस्य आहेत.

महाराष्ट्र गोवा विधी परिषदेच्या २५ जागांसाठी २४ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि.६) घोषित करण्यात आला. २५ जागांसाठी १५५ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत एकूण ९२ हजार ५१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

यातील ८८ हजार ३५७ मते वैध, तर ३ हजार ६९४ मते अवैध ठरली. यातून अॅड. वसंतराव साळुंके यांना पहिल्या पसंतीची एक हजार ८१२ मते पडली. ४ जून रोजी पहिल्या पसंतीच्या मतांची यादी घोषित झाली.

तर अंतिम निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यामध्ये त्यांना पसंती क्रमानुसार मिळालेल्या अंतिम मतांचे मूल्य ३ लाख ६९ हजार ३३० आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. वसंतराव दिगंबररराव साळुंके हे १९८२ पासून म्हणजेच स्थापनेपासून कार्यरत आहेत.

लॉयर्स अकॅडमीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न

शेतकरी, कष्टकरी, वंचित व बहुजन समाजातील विधिज्ञांच्या पाठबळामुळेच आपण पाचव्यांदा निवडून आलो आहोत. अगोदरच्या काळात ई-कोर्ट व ई-लायब्ररी सक्षम करण्यासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला. तर आगामी काळात महाराष्ट्र-गोवा विधी परिषदेच्या वतीने तळोजा येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स अकॅडमी व ट्रेनिंग सेंटरचे अधिक सक्षमीकरण व्हावे, चांगले विधिज्ञ येथून घडावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया अॅड. वसंतराव साळुंके यांनी निवडून आल्यानंतर व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT