Marathwada Graduate Constituency election : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज file photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Graduate Constituency election : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

भारत निवडणूक आयोगाने मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मंगळवारी (दि. २२) घोषणा केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Administration ready for Marathwada Graduate Constituency election

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भारत निवडणूक आयोगाने मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मंगळवारी (दि. २२) घोषणा केली आहे. त्यानुसार विभागातील ४६ विधानसभा मतदार संघामध्ये आचारसंहिता लागू झाली. तसेच निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. प्रत्येक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, मतदारांच्या तक्रारीवर गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेशही विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि. २३) प्रशासनाला दिले.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुदत संपणाऱ्या विधान परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे. ७ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी, तर ९ ऑक्टोबर रोजी अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, ३१ ऑक्टोबरपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

मराठवाड्यातील ४६ विधानसभा मतदार संघात १२ जानेवारीच्या यादीनुसार २ लाख ८८ हजार ७८३ मतदार आहेत. त्यासाठी ७५० यादी भाग तयार केले आहेत. या निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदान करता येणार आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन श्रीकांत यांनी केले. दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर मराठवाड्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

परवानग्यांसाठी एक खिडकी

आचारसंहितेच्या कालावधीत सभा व इतर कार्यक्रमांसाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना राबवा, असे आदेश जी. श्रीकांत यांनी दिले. त्यासोबतच मतदारांची नावे चुकीच्या ठिकाणी नोंदवली जाणे, वगळली जाणे, याबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT