हॉटेल अंबिकातील कुंटणखान्यावर कारवाई, चार पीडित महिलांची सुटका File Photo
छत्रपती संभाजीनगर

हॉटेल अंबिकातील कुंटणखान्यावर कारवाई, चार पीडित महिलांची सुटका

झाल्टा फाटा येथील हॉटेल अंबिकात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलिस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने हॉटेल अंबिका येथे छापा टाकून कुंटणखाना उघडकीस आणला.

पुढारी वृत्तसेवा

Action taken against the brothel in Hotel Ambika, four victim women rescued

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा झाल्टा फाटा येथील हॉटेल अंबिकात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलिस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने हॉटेल अंबिका येथे छापा टाकून कुंटणखाना उघडकीस आणला. या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक सुभाष फकिरा राठोड (४९, रा. अमराई, बजाज हॉस्पिटल मागे) व हॉटेल मालक विश्वास शिंदे (५१, रा. झाल्टा) या दोघांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झाल्टा फाटा येथील हॉटेल अंबिका येथे देहव्यापाराचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहायक निरीक्षक सरला गाडेकर यांना मिळाली, या माहितीच्या आधारे शनिवारी (दि.५) या कुंटणखान्यावर कारवाई करत चार महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांकडून जबरदस्तीने देहव्यापार करवून घेतला जात असल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनायकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी पूजा नागरे, सरला गाडेकर, स्वप्नील नरवडे, विनोद भालेराव, दिलीप साळवे, कपिल बनकर, ईशाद पठाण, सपना चरवंडे, भाग्यश्री चव्हाण व संदीप थोरात आदींनी केली.

अशिक्षित, गरिबीचा फायदा

या हॉटेलचा व्यवस्थापक राठोड व हॉटेल मालक विश्वास शिंदे अशिक्षित व गरीब असलेल्या महिला हेरून त्यांच्याकडून देहव्यापारांचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती तपासात समोर आली.

दरम्यान पोलिस पथकाने एक डमी ग्राहक पाठवून येथे देहव्यापार चालत असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर व्यवस्थापक व हॉटेल चालकाला ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिस पथकाने कारवाईदरम्यान मोबाईल फोन, निरोध पॅकेट्स व रोख रक्कम असा ५७ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT