Illegal Sand Mining : खोरवड येथे अवैध वाळू उपशावर कारवाई; ६३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त file photo
छत्रपती संभाजीनगर

Illegal Sand Mining : खोरवड येथे अवैध वाळू उपशावर कारवाई; ६३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

या कारवाईत सुमारे ६३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Action taken against illegal sand extraction at Khorvad; police seize material worth ₹63 lakh

मंठा / तळणी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यात असलेल्या खोरवड येथील पूर्णा नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे ९ ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे ६३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

खोरवड परिसरातील पूर्णा नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर मंठा पोलिसांनी विशेष पथक तयार करून शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास नदीपात्र परिसरात छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची एकच धावपळ उडाली. काही चालकांनी वाहनांसह पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी वेढा घालत ९ ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेतल्या. जप्त वाहनांमध्ये महिंद्रा, स्वराज, आयशर आणि अर्जुन कंपनीच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांसह वाळूची एकूण किंमत ६३ लाख १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईनंतर अवैध रेती व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली असून नदीपात्रातील बेकायदेशीर उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान एक आरोपी पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. सर्व ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंड भरल्याशिवाय वाहन मालकाच्या ताब्यात देऊ नये अशा आशयाचे पत्र मंठा पोलीस निरीक्षकांना दिले असल्याचे मंठा तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.

वाळू माफियांचे कंबरडे मोडणारी ही धडक कामगिरी जालना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग सिंधू व अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनि-रीक्षक संतोष माळगे, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, पोलीस हवालदार जगन्नाथ सुक्रे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष बनकर, आसाराम मदने, विलास कातकडे, समाधान खाडे, आनंद ढवळे, सज्जन काकडे आणि अनिल राठोड यांनी केली. या धडक गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक माळगे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT