Illegal Transport  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Illegal Passenger Transport : आजपासून अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध कारवाई

जिल्ह्यात आठ ठिकाणी एसटी. आरटीओचे पथक तैनात करणार

पुढारी वृत्तसेवा

Action against illegal passenger transport from today

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीचे प्रवासी खासगी वाहनधारक मोठ्या प्रमाणांवर पळवतात. यावर आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार सोमवार (दि. २) पासून जिल्ह्यातील आठ ठिकाणी एसटीचे एक आणि आरटीओचे एक पथक तैनात राहून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद मेहूल यांनी दिली.

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. एसटीचे पॉइंट ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणाहूनच खासगी बस चालक प्रवासी पळवत आहेत. यावर आळा घालण्यासाठी कडक कारवाईचे आदेश नुकतेच परिवहन विभागाने दिले आहेत.

कारवाईसाठी आरटीओ अधिकाऱ्यांची मदत घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरटीओचे एक पथक एसटीच्या मदतीला राहणार आहे. परिवहन विभागाने १ मार्चपासून कारवाई करण्याचे आदेश दिले, दरम्यान रविवारी सुटी असल्याने ही कारवाई सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचीही माहिती नेहूल यांनी दिली.

जिल्ह्यात आठ ठिकाणे विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या पॉइंटवरूनच प्रवाशांची पळवापळवी होत आहे. यात रेल्वेस्टेशन, हसूल, चिकलठाणा, गंगापूर, पैठण, सिल्लोड, कन्नड, पंढरपूर आदी आठ ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी एसटी आणि आरटीओचे पथक अवैद्ध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. दरम्यान, सोमवारी आरटीओ कार्यालयाला अधिकारी देण्याच्या मागणीसाठी पत्र देण्यात येणार असून, कारवाई तात्काळ सुरू करण्यात येणार असल्याच्याही माहिती नेहूल यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT