Kunbi Certificate : हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवणे सोपे : अभ्यासकांचा एकमुखी सूर  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Kunbi Certificate : हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवणे सोपे : अभ्यासकांचा एकमुखी सूर

कुणबी प्रमाणपत्र मार्गदर्शन शिबीर : शेकडो मराठा समाजबांधवांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

According to the Hyderabad Gazette, it is easy to obtain a Kunbi certificate

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : इतिहासात आणि दस्तऐवजांमध्ये मराठा समाजाचे कुणबी असल्याचे अनेक ठोस पुरावे उपलब्ध असून नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळेल. यासाठी मोडी व फारशी भाषेतील नोंदी, वंशावळ जोडणी-करून कागदपत्रांची तपशीलवार मांडणी करावी लागेल, असा एकमुखी सूर मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांनी लगावला.

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या प्रेरणेतून हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेवर आयोजित शिबिरात ते शेकडो समाजबांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते. छत्रपती कॉलेजमध्ये शनिवारी (दि. २७) सायंकाळी शिबीर पार पडले.

या शिबिरात तज्ञ मार्गदर्शक म्हणून रमेश सूर्यवंशी, प्रा. चंद्रकांत भराट, प्रशांत सदाफळ, शेखर शिंदे, लाभले होते तर यावेळी मंचावर सुरेश वाकडे, डॉ. मनीषा मराठे यांची उपस्थिती होती. यावेळी आपण १९६७ लाच आर-क्षणात आलो आहोत, हा लढा सर्वसामान्य मराठ्यांचा आहे. ओबीसी आरक्षणामुळे शिक्षण व नोकरीच्या संधी मिळाल्या. त्यामुळे याचे महत्त्व जाणून गावागावात समजूतदारपणे काम करणे आवश्यक आहे. काही बुद्धिभेद करणाऱ्यांच्या वक्तव्यांमुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. पण प्रमाणपत्र मिळते, हे लोकांना समजावून आता सांगणे आवश्यक आहे. यासोबत नमुना क्रमांक २, ६, १३, १४ चा उपयोग, तसेच सातबारा, खासरा, शेतावर पत्रक, खरेदीखत, भूमिअभिलेख यांद्वारे वंशावळ जोडण्याच्या पद्धतीही समजावून सांगितल्या. शिबिराला शेकडो मराठा समाजबांधव उपस्थित होते.

मुंबई जिंकली, आता दिल्ली जिंकायची !

अभ्यासक म्हणाले, हैदराबाद गॅझेटनुसार मनामध्ये किंतु न ठेवता सरळ प्रमाणपत्र काढावे. तसेच आपण मुंबई जिंकली, आता दिल्ली जिंकायची वेळ आली आहे. मनोज जरांगे यांचे स्वप्न पूर्ण करणे हे आपले ध्येय आहे. तसेच आपल्याकडे असलेल्या विविध नोंदी, दस्तऐ-वजांच्या आधारे प्रमाणपत्र मिळू शकते. काही चुका झाल्यास त्या सुधारता येतात. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता, सकारात्मकतेने काम करा, असेही मत अभ्यासकांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT