Sambhajinagar News : व्हीव्हीआयपी ताफ्यातील गाडीला अपघात  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : व्हीव्हीआयपी ताफ्यातील गाडीला अपघात, मोपेडस्वार समोर आल्याने तीन वाहने एकमेकांवर आदळली

सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

पुढारी वृत्तसेवा

Accident to a vehicle in the VVIP convoy

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे दोन्ही व्हीव्हीआयपींचे शुक्रवारी (दि.१०) दौरे असल्याने पोलिस दलाकडून दिवसभर वाहनाचा ताफा जालना रोडने फिरत होता. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास विमानतळावर व्हीव्हीआयपींना घेण्यासाठी निघालेल्या वेगवान ताफ्यासमोर अचानक मोपेडस्वार तरुणी आल्याने स्कार्पिओ चालकाने ब्रेक लावल्याने ताफ्यातील तीन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

शहारत व्हीव्हीआयपींचे सातत्याने दौरे सुरू आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही नेते पक्षाच्या आढावा बैठकीसाठी शहरात आले होते. त्यासोबतच मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, संजय शिरसाठ, मेघना बोर्डीकर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खा. डॉ. भागवत कराड अशी नेतेमंडळी शहरात होती. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर आगमन झाले. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास चिकलठाणा विमानतळाकडे व्हीव्हीआयपींना घेण्यासाठी वाहनाचा ताफा निघाला होता.

मुकुंदवाडी सिग्नलजवळ वेगवान ताफ्यासमोर मोपेडस्वार तरुणी अचानक आल्याने तिला पाहून ताफ्यातील स्कार्पिओ चालकाने ब्रेक लावताच पाठीमागून सुसाट कार स्कार्पिओवर आदळली. कारच्या मागून आलेली दुसरी स्कार्पिओही कारवर आदळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ताफ्यातील वाहनात कोणीही व्हीव्हीआयपी नव्हते. खुला ताफा असल्याने मोठा अनर्थ टळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT