Accident News : कसाबखेडा फाट्याजवळ अपघातात तरुणाचा मृत्यू file photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News : कसाबखेडा फाट्याजवळ अपघातात तरुणाचा मृत्यू

दोघे किरकोळ जखमी; पंक्चर झालेल्या पिकअपचे टायर बदलताना स्कॉर्पिओची धडक

पुढारी वृत्तसेवा

Accident News: Youth dies in an accident near Kasabkheda Phata

वेरूळ, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर- धुळे महामार्गावरील राष्ट्रीय कसाबखेडा आकाश सातदिवे फाट्याजवळील मलकापूर शिवारात रविवारी (दि. २५) दुपारी झालेल्या अपघातात चिंचोली येथील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. पंक्चर झालेल्या पिकअपचे टायर बदलण्याचे काम सुरू असताना पाठीमागून आलेल्या स्कॉर्पिओने पिकअपला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. आकाश पुंजाराम सातदिवे (वय २२, रा. चिंचोली, ता. खुलताबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथून सोयाबीन विक्रीसाठी आकाश हा पिकअप (एमएच २० जीसी २३३४) घेऊन वेरूळच्या दिशेने जात होता. दरम्यान, कसाबखेडा फाट्याजवळील मलकापूर शिवारात राष्ट्रीय महामार्गावर पिकअपचे टायर पंक्चर झाले. त्यामुळे चालकाने वाहन महामार्गाच्या कडेला उभे करून टायर बदलण्यास सुरुवात केली.

याचवेळी पाठीमागून आलेल्या स्कॉर्पिओने (एमएच ५७ १३१३) उभ्या असलेल्या पिकअपला जोरदार धडक दिली. या धडकेत आकाश सातदिवे याचा मृत्यू झाला, तर हिरालाल कचरू सातदिवे (वय ५०) आणि पिकअपचालक ज्ञानेश्वर बोडखे (वय ३८) हे दोघे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या झिरपे, हेड कॉन्स्टेबल विनोद तांगडे, जारवाल, शरद दळवी आणि शांताराम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT