Ajintha Ghat : अजिंठा घाटात अपघात; ४ किलोमीटर वाहनांच्या रांगा file photo
छत्रपती संभाजीनगर

Ajintha Ghat : अजिंठा घाटात अपघात; ४ किलोमीटर वाहनांच्या रांगा

तीन तास वाहतूक कोंडी; पर्यटकांसह वाहनधारकांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

Accident in Ajintha Ghat; 4-kilometer-long queues of vehicles

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा: जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील अजिंठा घाटात दोन अवजड ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. रविवारी सायंकाळ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे घाटात तब्बल तीन तास वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूंनी सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अजिंठा लेणी पाहून परतणाऱ्या पर्यटकांसह प्रवासी व वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश येथून तमिळनाडूकडे कॉटन रोल घेऊन जाणारा ट्रक (टीएन ४७ एएस ०१७५) सायंकाळच्या सुमारास अजिंठा घाट चढत असतांना. यावेळी बेळगाव येथून दिल्लीकडे रताळ्याची वाहतूक करणारा ट्रक (एमपी ०६ एचसी ७४५०) घाटातून खाली येत होता. घाटातील एका अवघड वळणावर दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेमुळे तमिळनाडूकडे जाणारा ट्रक रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतुकीचा मार्ग पूर्णत, अडवला गेला.

अपघाताची वेळ सायंकाळ असल्याने अजिंठा लेणीला भेट देऊन परतणाऱ्या पर्यटकांची अनेक वाहने या कोंडीत अडकली. अवजड वाहनांसह चारचाकी व इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे पर्यटकांसह वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT