नर्सिंगच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल 
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : जगण्याचा कंटाळा आलाय, म्हणत नर्सिंगच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

खंडाळा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर : नर्सींगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१०) दुपारी तालुक्यातील खंडाळा येथे घडली. पायल सुधाकर गोतीस (वय २०) असे मृत युवतीचे नाव आहे.

पायलने जगण्याचा कंटाळा आला आहे , अशी चिठ्ठी लिहून राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घटेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नलावडे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT