Crime News :  file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : त्रिमुर्ती चौकात तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

मित्राच्या राखीच्या हातगाडीजवळ गप्पा मारत उभ्या असलेल्या तरुणावर पाठीमागून येऊन सराईत आरोपीने विनाकारण कोयत्याने जीवघेणा हल्ला चढविला.

पुढारी वृत्तसेवा

A young man was fatally attacked by a coyote in Trimurti Chowk

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मित्राच्या राखीच्या हातगाडीजवळ गप्पा मारत उभ्या असलेल्या तरुणावर पाठीमागून येऊन सराईत आरोपीने विनाकारण कोयत्याने जीवघेणा हल्ला चढविला. मानेवर होणारे वार दोन्ही हातावर झेलल्याने त्याचा जीव वाचला, मात्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. ही थरारक घटना मंगळवारी (दि.२५) रात्री १० वाजेच्या सुमारास त्रिमूर्ती चौकात घडली. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन गवळी (३८, रा. बौद्धनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, तो घाटी रुग्णालयात तब्येत ठीक नसल्याने भरती असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले.

फिर्यादी अरुण उत्तम जोगदंडे (३९, रा. बौद्धनगर, जवाहर कॉलनी) हे मंगळवारी (दि. २५) रात्री जेवण करून फेरफटका मारण्यासाठी त्रिमुर्ती चौकात गेले. तिथे त्यांचा मित्र अरुण काथार याच्या राखीच्या हातगाडीजवळ उभा वाजेच्या सुमारास आरोपी रोहन गवळी हातात कोयता घेऊन अचानक पाठीमागून आला आणि त्याने काहीही कारण नसताना अरुणवर सपासप वार करण्यास सुरुवात केली.

रोहनने अरुणला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मानेवर डाव्या बाजूने कोयत्याचा वार केला. मात्र, अरुणने प्रसंगावधान राखून तो वार हाताने अडवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अरुण घाबरले, त्यानी पुढचे सर्व वार आपल्या उजव्या आणि डाव्या हातावर झेलले. यामुळे त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन त्याना भोवळ आली.

राहून गप्पा मारत उभे होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अरुणला पाहून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यापैकी महेंद्र खरात या नागरिकाने त्याला तातडीने हेडगेवार रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला एमआयडीसी चिकलठाणा येथील ईएसआयसी रुग्णालयात हलवण्यात आले. तपास जवाहर नगर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT