Knife Attack : कौटुंबिक वादातून तरुणावर चाकू हल्ला Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Knife Attack : कौटुंबिक वादातून तरुणावर चाकू हल्ला

कौटुंबिक वादातून भाऊ-भावजयीने तरुणावर चाकू हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

A young man was attacked with a knife due to a family dispute

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून भाऊ-भावजयीने तरुणावर चाकू हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ४ फेब्रुवारी रोजी सकाळी जाधवमंडी परिसरातील राजाबाजारात घडली.

अक्षय घनश्याम बारीकरालवाले (३२) आणि मनीषा अक्षय बारीकरालवाले (२३, दोघे रा. राजाबाजार, जाधवमंडी) असे चाकू हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश घनश्याम बारीकरालवाले (३०, रा. जाधवमंडी) यांने ४ फेब्रुवारी रोजी सकाळी पत्नीला कोणाचीही परवानगी न घेता घरी आणल्याचा राग आल्याने त्यांचा भाऊ अक्षय बारीकरालवाले याने शिवीगाळ सुरू केली.

वाद वाढत असताना समजावून सांगण्यासाठी गणेशची आई व पत्नींनी मध्यस्थी केली. त्यावेळी अक्षयने आईला मारहाण केली. तसेच गणेशवर चाकूने हल्ला केला. तर मनीषा बारीकरालवाले हिने गणेश त्याची पत्नी व त्याच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार गायके करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT