Sambhajinagar News : कंटेनरच्या चाकाखाली चिरडून मोपेडस्वार तरुण ठार file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : कंटेनरच्या चाकाखाली चिरडून मोपेडस्वार तरुण ठार

कामावर निघालेल्या एका मोपेडस्वार तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडले. ही घटना रविवारी (दि.८) सकाळी साडेदहाच्या सुमारास चिकलठाणा आठवडी रस्त्यावर घडली.

पुढारी वृत्तसेवा

A young man riding a moped was killed after being crushed under the wheels of a container truck.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

कामावर निघालेल्या एका मोपेडस्वार तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडले. ही घटना रविवारी (दि.८) सकाळी साडेदहाच्या सुमारास चिकलठाणा आठवडी रस्त्यावर घडली. शहेबाज कामरोद्दीन बागवान (३१, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) असे मृताचे नाव आहे.

शहेबाज बागवान बाजार परिसरातील मुख्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहबाज हा जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्री दुकानात फायनान्सशी संबंधित काम करायचा. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तो घरून कामावर जाण्यासाठी मोपेडवरून निघाला होता.

चिकलठाणा आठवडी बाजार परिसरात आला असता, मोपेडचा तोल जाऊन तो पडल्याने मागून आलेल्या भरधाव कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्या गेला. गंभीर जखमी शहेबाज यांना नागरिकांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शहवाज हे विवाहित होते. त्याच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यावरून कंटेनरचा पोलिस शोध घेत आहेत. पुढील तपास अंमलदार कोतवाल करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT