Sambhajinagar Crime : रस्त्यात बाधित घर पाडण्याच्या धास्तीने तरुणाने जीवन संपवले  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : रस्त्यात बाधित घर पाडण्याच्या धास्तीने तरुणाने जीवन संपवले

चिकलठाण्यात मृतदेह रस्त्यावर ठेवून मनपा विरोधात आक्रोश, गावकऱ्यांनी २ तास रोखला जालना रोड

पुढारी वृत्तसेवा

A young man ended his life due to fear of demolition of a house on the road.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृतसेवा महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यानुसार जालना रोडवरील मुकुंदवाडी ते चिकलठाणा रस्त्यालगतच्या मृत राजेश्वर घरांवर पालिकेमें नवपुते बुलडोजर फिरविला. त्यामुळे आपल्यालाही घरावर मार्किंग झाल्याने अख्खे घर पडण्याच्या धास्तीने तरुण शेतकरी राजेश्वर साईनाथ नवपुते (३०, रा. महादेव गल्ली) यांनी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. या हृदयद्रावक घटनेचे पडसाद चिकलठाण्यात उमटले, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावकर्यांनी मृतदेह रस्त्यावर आणून मनपा विरोधात जालना रोड तब्बल २ तास रोखून संताप व्यवत केला.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजेश्वर नवपुते यांची जालना रोडलगत वडिलोपार्जीत जागा आहे. २०१३ साली नवपुते यांनी शेती तिकून सुमारे ७० ते ८० लाख खर्चन खाली दुकाने व वर दोनमजली वा बांधले. शेती दुग्धव्यवसाय करूप्न कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तीन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना चार महित्यांचा मुलगा आहे. पत्नी बाहेरी गेलेली होती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी चिकलठाणा परिसरातील नवीन ६० मीटर विकास आराखड्यात बाधित होणाऱ्या घरांवर मार्किंग करून कारवाई सुरू केली. व्यावसायिक इमारती, घर, टपऱ्या पाडण्यात आल्या.

त्यानंतर हायकोर्टात प्रकरण गेल्याने १५ ऑगस्टपर्यंत मुदत मिळाली. त्यानंतर अनेक कुटुंबांना आपले घर सोडावे लागले, राजेश्वर यांनीही घर पडण्याच्या धास्तीने सावित्रीनगर भागातील शेतात भाड्याने खाली मेडल साहित्य हलविले होते. ते अनेक महिन्यापासून तिथे राहत होते.

मात्र, नंतर कारवाई रेंगाळल्याने काही सामान घेऊन नवपुते कुटुंबीय पुन्हा चिकलठाण्यात राहायला आले. मात्र, राजेश्वर शेतातच झोपायला जायचे, ते सर पडण्याच्या धास्तीने तणावात होते बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे दूध घेऊन सकाळी ते घरी न आल्याने त्यांचा भाऊ भाग्येश्वरव मावस भाऊ बघायला गेले तेव्हा पत्र्याच्या खोलीत गळफास घेतल्याचे निदर्शनास आले राजेश्वरला बेशुद्धावस्थेत मिनी घाटीत हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे चिकलठाण्यात उद्रेक झाला.

दोन तास वाहतूक ठप्प

गावकर्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. हायकोर्ट स्ािल ते केंद्रिक चौकापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या. दंगा काबू पथकासह मोटा फौजफाटा दाखल झाला, डीसीपी स्वामी, एसीपी मनोज पगारे, निरीक्षक संभाजी पवार, अविनाश आपाय, गजानन कल्याणकर, निर्मला परदेशी, अतुल वेरमे, सचिन इंगोले, सुनीता मिसाळ यांनी समजूत मातम्याचा प्रयत्न करता मात्र, संतत गावकरी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्याविरुद्ध जोरदार भी पगा देऊन उवष्यास तयार नव्हते. अखेर दोन वेळा लेखी पात्र दिले तरी समाधान झाले नसल्याने पोलिस बाजूला सरकले,

नातेवाईकांच्या मागण्या काय?

मृताच्या कुटुंबाला मनपाने ५० लाखांची आर्थिक मदत करावी, त्याच्या पत्नीला पालिकेत कायमस्वरूपी नोकरी आणि घर मिळाले. अशा मागण्या केल्या. मात्र, मनपातर्फे तोडगा निश्रत नसल्याने गावकरी आक्रमक झाले. जालना रोड रोखण्याचा इशारा दिला. तरीही पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

काही कळण्याच्या आत मृतदेह ठेवला रस्त्यावर

मिनी घाटी आणि नवपुते यांच्या घरासमोर मोठी गर्दी झाली होती, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता, संतप्त गावाच्यांनी सायंकाळी सच्या सहाच्या सुमारास बासमोर रस्त्यालगत लिय्या दिला. तरीही प्रशासन मागण्या मान्य करत नसल्याने सांडेसहाच्या सुमारास आक्रमक हीत बेट जालना रोडबर चौकात दीन्ही बाजूनी रस्ता रोको केला. त्याचवेळी काही जणांनी थेट मृतदेह सत्यावर आणून ठेवल्याने तणाव निर्माण झाला.

बेघर कुटुंबीयांचा उद्रेक

राजेश्वरख्या आत्महत्येने चिकलठामा परिसरात मनपा निरुद्ध उद्रेक झाला. अतिक्रमण कारवाईमुळे अनेकांचे व्यवसाय उद्धवस्त झाले. संसार उघडयावर आले. राजेशरचा मनपामुळेच बळी गेल्याची भावना गावक-यांची झाली आहे. त्यामुळे पूर्ण गाव रकचावर उतरले होते.

मनपाने पत्रात काय दिले आश्वासन ?

मनपा अतिरिक्त आयुक्तांनी साईनाथ नवपुते यांच्या नाचे लेखी पता दिले, पामध्ये मृत राजेश्वर यांच्या बांधकामाच्या तसेच जमिनीच्या मालकी अनुषंगाने कागदपशंची तपासणी व रीतसर प्रक्रिया करून कायदेशीर आरसीसी किंवा रोख स्वरुपात मोबदला देण्यात येईल किया पीएन आवास योजनेत सदनिका उपलब्ध करून देऊ. मनपा आयुक्तांच्या मान्यतेने असे नमूद केले आहे. आमदार अनुराधा चव्हाण यांनीही फोन करून गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

अखेर कुटुंबीयांनी उचलला मृतदेह

रात्री साडेआातच्या सुमारास नक्पुले कुटुंबीयांनी मृतदेह अंत्यविधीसाठी हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, तरीही काही गावकत्‌यांनी पुन्हा सत्यावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांची समजूत घालून सता अखेर मोकळा केला. चिकलठाणा स्मशानभूमीत रात्री नऊच्या सुमारास राजेश्वर यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनपा आयुक्त येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

शवविच्छेदनानंतर नारोबाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मनपा आपका जी. श्रीकांत यांनी येऊन ठोस आश्वासन द्यावे, अशी मागणी केली. डीसीपी प्रशांत स्वामी, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी समजूत घातली मात्र कोणीही ऐकण्याख्या मनस्थितीत नव्हते. मनपाचे प्रभारी सहायक आयुक्त संजय सुरडकर यांना पाचारण केले. मात्र तोडगा निघाला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT