Sambhajinagar News : ऐन दिवाळीत ७०० ची जलवाहिनी फुटली, मनपाकडून तातडीने दुरुस्ती सुरू  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : ऐन दिवाळीत ७०० ची जलवाहिनी फुटली, मनपाकडून तातडीने दुरुस्ती सुरू

बाराशे, नऊशेमुळे शहराला दिलासा

पुढारी वृत्तसेवा

A water pipe Line 700 burst during Diwali, the municipality has started immediate repairs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराला पाणी पुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी शनिवारी (दि. १८) पहाटे फारोळा जलशुद्धीकरण केंद्राजवळ फुटली. त्यामुळे ऐन दिवाळीतच जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, पाणीपुरवठा विभागाने बहुतांश भागाला उशिराने पाणीपुरवठा करण्यात आला. तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने धाव घेत फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. रात्री उशिराने जलवाहिनी दुरुस्त होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि.मी. आणि १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करता येत नाही. यापूर्वी जलवाहिनी फुटत असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या घटना घडत होत्या. आता मात्र ९००च्या जलवाहिनीतून पाणी सुरू झाल्याने शहराला १७१ एमएलडी इतके पाणी मिळत आहे. त्यामुळे पाण्याचा गॅप एक दिवसाने कमी झाला आहे. दिवाळी सणासाठी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता पाणीपुरवठा विभागाने पथके स्थापन केली असून गस्त वाढवली आहे. पाणीपुरवठ्याचे काटेकोरपणे नियोजन सुरू असतानाच शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास फारोळ्याजवळील स्टिल कंपनीजवळ फुटली.

दरम्यान, जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता एम. एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता सुभाष लोहाडे, आशिष वाणी यांच्यासह कंत्राटदाराच्या कामगारांनी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. जलवाहिनी फुटलेल्या जागेत सर्वत्र पाणी साचल्याने ते बाहेर काढण्यासाठी दुपार गेली. त्यानंतर जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

पाणीपुरवठा सुरळीतच : धांडे

ऐन दिवाळी सणाला सातशे मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली असली तरी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ दिला नाही. नऊशे आणि बाराशेच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू असून सातशेची जलवाहिनी फुटली असली तरी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ दिला नाही, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT