Sambhajinagar News : शहानूरवाडीतील 'त्या' वादग्रस्त जागेवर टोलेजंग अपार्टमेंट file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : शहानूरवाडीतील 'त्या' वादग्रस्त जागेवर टोलेजंग अपार्टमेंट

गुन्हा दाखल झाल्याने 'वन वर्ल्ड'मध्ये फ्लॅट, दुकाने खरेदी केलेले ग्राहक हवालदिल

पुढारी वृत्तसेवा

A towering apartment complex on 'that' controversial site in Shahanurwadi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा बनावट कागदपत्रांचे आधारे हस्तांतरीत शहानुरवाडीतील त्या वादग्रस्त जागेवर मनजीत प्राइडकडून वन वर्ल्डमध्ये शेकडो फ्लॅट, दुकानांचा टोलेजंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. सध्यस्थितीत शहरातील हा सर्वात मोठ्या निवासी आणि कमर्शियल प्रकल्पांत अनेक ग्राहकांनी कोट्यावधींची गुंतवणूक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या या जागेवर उभारलेल्या प्रकल्पात घर, दुकाने घेतलेले शेकडो ग्राहक हवालदील झाले आहेत. बुकिंग करणारेही संभ्रमात पडले आहेत.

शहानूरवाडी येथील ४ हेक्टर ७६ आर जमिनीचा मूळ कुळधारक बदलून बनावट अर्ज, शपथपत्र आणि फेरफाराच्या आधारे जमीन हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात श्रीकांत कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत पोलिसांनी गंगाधर गिरधारीलाल ऊर्फ लाल राजपूत परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अन्य १३ जणांच्या भूमिकेची तपासणी होणार आहे. गुरुतेग बहाद्दर शैक्षणिक संस्थेसह अन्य व्यक्तींच्या माध्यमातून जमिनीचे व्यवहार झाले.

आजघडीला वादग्रस्त असलेल्या या जागेवर मनजित प्राइड ग्रुपचे नितीन बगडिया व नवीन बगडिया यांचा वन वर्ल्ड हा पाच २१ मजली टोलेजंग इमारतींचा निवासी व कमर्शियल प्रकल्प उभारण्यात येत आहे. साडेतीन वर्षांहून अधिक कालावधीपासून या प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. शहर-जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील असंख्य ग्राहकांनी या प्रकल्पात घरे व दुकानांमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, प्रकल्पाची जागाच वादग्रस्त ठरल्याने हे गुंतवणूक

तक्रारीत या बिल्डरांचीही नावे

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत कांबळे यांनी तरविंदरसिंग धिल्लन, राजेंद्रसिंग जबिदा, देवानंद कोटगीर, नवीन बगडिया, नितीन बगडिया, रमेश नागपाल, गंगाराम गिरधारीलाल ऊर्फ राजपूत ऊर्फ परदेशी, राजरतन गोपाल, प्रेम गोपाल, चंद्रेलाल पुरुषोतमलाल, चिगनलाल पुरुषोतमलाल यांची नावे आहेत. पोलिसांनी गंगाधर गिरधारीलाल ऊर्फ लाल राजपूत परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अन्य १३ जणांच्या भूमिकेची तपासात पडताळणी होणार आहे.

बड्या कंपनीकडून बुकिंग ?

शहानूरवाडी येथे ११ एकर जागेवर वन वर्ल्डचा प्रकल्प उभारला जात असून, यामधील पाच २१ मजल्यांचे टॉवर्स हे शहरातील सर्वात उंच टॉवर्स ठरले आहेत. यातील एका टॉवरमध्ये ऑरिक येथे प्रस्तावित मोठ्या कंपनीकडून त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी घरे बुकिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, हा प्रकल्प उभारला जात असलेली जागा आजघडीला वादग्रस्त ठरल्याने बुकिंग करणारे संभ्रमात पडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT