Sambhajinagar News : आरटीओच्या 'मारहाणी'वरून समृद्धीवर हायव्होल्टेज ड्रामा !

ट्रक आडवा लावल्याने तासभर वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा
Vaijapur Truck Driver Protest
आरटीओ पथकाने ट्रक थांबविताच चालकाने समृध्दी महामार्गावर ट्रक आडवा लावल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली होती. इन्सेटमध्ये काळा रंग लावून खोडलेली नंबरप्लेट.pudhari photo
Published on: 
Updated on: 

वैजापूर :आरटीओ पथकाने मारहाण केल्याचा आरोप करत एका ट्रकचालकाने समृद्धी महामार्गाच्या जांबरगाव एक्झिट पॉइंटजवळील सर्व्हिस रोडवर ट्रक आडवा लावला. शनिवारी (दि. १७) सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर वैजापूर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर चालकाने ट्रक बाजूला घेतल्याने वाहतूक पूर्ववत झाली.

उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील ट्रकचालक गुल्फाम शमसेर (ट्रक क्रमांक यूपी ७२ सीटी ७७८६) याने सकाळी नऊच्या सुमारास जांबरगाव एक्झिट पॉइंटवरील सर्व्हिस रोडवर ट्रक आडवा उभा केला आरटीओ पथकाने मारहाण केल्याचा आरोप करत त्याने ट्रक बाजूला घेण्यास नकार दिला. त्यामुळे सर्व्हिस रोडवरील वाहतुकीचा खोळंबा होऊन त्याचा परिणाम मुख्य महामार्गावरील वाहतुकीवरही झाला.

Vaijapur Truck Driver Protest
MHADA Builder Fraud Case : ग्राहकांना फसवणाऱ्या बिल्डरांना म्हाडाचा दणका

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे आणि अमोल कांबळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि परिवहन विभागाच्या पथकाने चालकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, चालक आपल्या आरोपावर ठाम राहिला. अखेर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर त्याने ट्रक बाजूला घेतला आणि वाहतूक सुरळीत झाली.

ट्रकच्या नंबर प्लेटवर रंग लावला

दरम्यान, ट्रकच्या नंबर प्लेटवर काळसर रंग लावून क्रमांक लपवण्यात आल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. यामुळे संशय आल्याने ट्रक थांबवून चौकशी करण्यात आली. त्यावेळी केलेल्या सक्तीचा राग आल्याने चालकाने ट्रक आडवा लावल्याचा दावा मोटार वाहन निरीक्षक विलास लेदाडे यांनी केला.

Vaijapur Truck Driver Protest
Parbhani Cyber Crime : परभणीत निवृत्त प्राध्यापकाला १ कोटीचा गंडा; पाच जण ताब्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news