A sword was seized from a drug trafficking gang along with 20 grams of MD drugs
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. अटकेत असलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीअ-ाधारे गुन्हे शाखेने आरोपीच्या घरावरील पत्र्यातून शनिवारी (दि.३१) २०.३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एक तलवार जप्त केली. या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एकूण १२ जणांविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या शेख कलीम शेख सरदार याची पोलिस कोठडीत चौकशी केली. चौकशीदरम्यान शेख कलीम याने आणखी एमडी ड्रग्ज साठवून ठेवले असून ते घराच्या लोखंडी पत्र्यावर लपवून ठेवल्याची माहिती दिली. माहिती आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून २०.३९ ग्रॅम एमडी आणि लाल म्यान असलेली स्टीलची तलवार जप्त केली.
ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अर्जुन कदम, सहायक फौजदार दिलीप मोदी, हवालदार प्रकाश गायकवाड, शेख नवाब, अशरफ सय्यद, अमोल शिंदे, सागर शेंडे, रोहित जाधव, पूजा भोसले यांनी केली.
आणखी एका आरोपीला अटक
दरम्यान, या टोळीतील शेख सोहेल ऊर्फ चाऊ शेख सत्तार (२३, रा. बायजीपुरा) यालाही गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात एकूण १२ जणांचा सहभाग उघडकीस आला असून, त्यांच्याविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात २९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख कलीम शेख सरदारसह अन्य तिघांना ३१ जानेवारी रोजी न्यायालयाने १ फेब्रुव- ारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर शेख सोहेल याला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.