A student was kidnapped for walking with his girlfriend, taken to the mountains and beaten up
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
मित्रासह दोन मैत्रिणीसोबत प्रोझोनमध्ये फिरायला गेलेल्या विद्यार्थ्याला त्या मुलीसोबत का बोलतो, फिरतो, काय चालू आहे तुमचे ? असे म्हणत एका विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आले. आणि पडेगाव येथील डोंगरात नेऊन बेल्टने जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी मारहाण् करण्यात आली. (दि.२६) सायंकाळी साडेपाच ते रात्री नऊच्या सुमारास घडली.
फिर्यादी संजय (नाव बदललेले) (१७, रा. अंबड, ह. मु. जयभवानीनगर) याच्या तक्रारीनुसार, हा आई वडिलांसोबत राहतो. वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदारनिवार्ह करतात. तर संजय १२ वी उत्तीर्ण असून, तो आकाशवाणी भागातील एका कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करत आहे.
त्याचा मित्र दीपक हा त्याचा शाळेपासूनचा मित्र आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास दोन जण दुचाकीवर प्रोझोन मॉल येथे गेले. तिथे दीपकची मैत्रीण मुस्कान (नाव बदललेले) आणि शबाना (नाव बदललेले) मॉलमध्ये आल्या होत्या. चौघेही दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत मॉलमध्ये फिरले व खरेदी केली. थोडे स्नॅक्स खाल्ले त्यानंतर साडेपाचच्या सुमारास तेथून बाहेर पडले. दीपक त्या दोघींसोबत पायी मॉल समोरून निघाला होता. त्यांच्यामागे संजय दुचाकी घेऊन जात होता. तेवढ्यात स्पोर्ट बाईकवर दोन जण आले.
त्यांनी संजयला त्या मुलींसोबत का बोलतो व फिरतो, असे म्हणत एक जण त्याच्यासमोर तर एक मागे बसून दुचाकीने अपहरण करून घेऊन निघाले. पिरॅमिड चौकात संजयने दीपकला आवाज दिला, पण त्याने पाहिले पण दोघे त्याला सरळ घेऊन निघाले. त्याच्यासोबत बर्गमन आणि स्पोर्ट बाईकवर पाच ते सहा जण सोबत निघाले. दोन्ही गाड्या मागेपुढे ठेवून संजयला पडेगावच्या डोंगराकडे घेऊन गेले.
डोंगराकडे नेऊन संजयला आठ ते नऊ जणांनी त्याला बेल्ट, लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण सुरू केली. काही वेळाने पोलिस शोधत असल्याचे कळताच टोळक्याने संजयला रात्री नऊच्या सुमारास हॉटेल अंबाई पॅलेसजवळ आणून सोडले. संजय पिरॅमिड चौकात आला. तिथे त्याला पोलिस घेण्यासाठी आले होते.