A son of Sambhajinagar to take up a leadership role at a London university
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय रंगभूमीसाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी छत्रपती संभाजीनगरचे सुपुत्र कुणाल मंगलसिंग राजपूत यांनी केली आहे. त्याची जगातील दुसऱ्या क्रमांकाची युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स लंडन येथे इंडस्ट्री लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इंग्लंड सरकारने त्यांच्या कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ग्लोबल टॅलेंट व्हिसा फॉर आर्टिस्ट्स प्रदान केला आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्याची ही महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे. पारंपरिक नाट्यपरंपरा आणि आधुनिक अभिनय तंत्र यांचा सुंदर समन्वय साधत त्यांनी कला क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
राजपूत यांच्या या यशामुळे छत्रपती संभाजीनगरचे नाव जागतिक रंगभूमीवर उज्ज्वल झाले असून, त्यांच्या या कामगिरीबद्दल शहरातून तसेच सामाजिक कार्यकर्ते एल. डी. ताटू यांनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मनपाचे निवृत्त अधिकारी मंगलसिंग राजपूत यांचे ते चिरंजीव आहेत.