A road blockade protest was held in Paithan on Saturday by the Swabhimani Shetkari Sanghatana.
पैठण, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अतिवृष्टी व जिल्हाधिकाऱ्यांसह जलसंपदा विभागाने लादलेल्या पुराच्या पाण्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिकांना दिवाळीच्या आत मदत न दिल्यास मंत्री, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.खा राजू शेट्टी यांनी दिला.
पैठण येथे शनिवारी दि.४ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. आंदोलनाप्रसंगी मा.खा राजू शेट्टी यांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार राहुल बनसोडे, मंडळ अधिकारी कल्पना शेळके यांना देण्यात आले आहे. या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना जिल्ह्यातील जाणाऱ्या विविध मागांवरील वाहतुकीची कोंडी झाली होती.
यावेळी ज्ञानदेव मुळे, चंद्रकांत झारगड, शिवाजी धरपळे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, पवन सिसोदे विष्णू बोडखे, किशोर ढगे, शिवाजी साबळे, सुरेश काळे, कृष्णा साबळे, रावसाहेब लवांडे, अजम खान, राजू बोगाणे, मेने आप्पा, गणपत खरे, विकास जाधव, संतोष कणके, भाऊसाहेब थोरात, दिनकर पवार, संतोष तांबे, सचिन बोडखे, योगेश घोणे, सुखदेव लबडे, कृष्णा काळे, योगेश औटे, मोहनराव खताड, भाऊसाहेब नरके, कल्याण वाघ, अनिरुद्ध चौधरी, शिशुपाल औटे, प्रशांत भुमरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.