A prisoner serving a life sentence ended his life in Paithan
पैठण, पुढारी वृत्तसेवा पैठण ते शेवगाव मार्गावरील येथील जिल्हा खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानी शुक्रवारी ( दि.२३) सकाळी कारागृहाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत चिंचाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून जीवन संपवले.
बंदीचे नाव शांतीलाल तान्ह्य ओझरे (वय ४४ वर्ष रा. पालघर) असे आहे. २०२३ मध्ये शांतीलाल तान्हा ओझरे हा बंदी जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी नाशिक कारागृहातून पैठण येथील जिल्हा खुले कारागृहात येथे वर्ग झालेला होता.
या बंदिनी शुक्रवारी सकाळी कारागृहाच्या भिंतीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याची माहिती पैठण खुले कारागृह अधीक्षक राजेंद्र निमगडे यांना देण्यात आली.
पैठण पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांना याबाबत सांगितल्यानंतर खुले कारागृह येथे नायब तहसीलदार राहुल बनसोडे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, उपनिरीक्षक संभाजी खाडे, उपनिरीक्षक अजीज शेख, पोकॉ महेश माळी, अंधारे, तांबे, लक्ष्मण पुरी, ढाकणे यांनी पंचनामा केला. उपनिरीक्षक अजिज शेख पुढील तपास करीत आहे.