Sillod Accident : रस्त्यावर उभ्या टँकरला दुचाकी धडकली; एक ठार, एक जखमी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod Accident : रस्त्यावर उभ्या टँकरला दुचाकी धडकली; एक ठार, एक जखमी

सिल्लोड शहरालगत जिनिंगजवळील घटना, अपघाताने मित्रांची ताटातूट

पुढारी वृत्तसेवा

A motorcycle collided with a parked tanker on the road; one dead, one injured

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :

रस्त्यावर उभ्या असलेल्या एका पेट्रोल टँकरला पाठीमागून दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला, तर एक जण जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि.३१) रात्री साडेआठच्या सुमारास सिल्लोड-भराडी रस्त्यावरील शहरालगतच्या अग्रवाल जिनिंगजवळ घडला.

सागर बाळू खैरे (२८, रा. अन्वी) असे मृत तरुणाचे तर ज्ञानेश्वर वाळूबा जाधव (२७, रा. अन्वी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सागर खैरे व ज्ञानेश्वर जाधव हे दोघे मित्र दुचाकीवरुन (एमएच २०, सीझेड- २४९३) भराडीकडून गावी अन्वीकडे परत येत होते. तर शहरालगत असलेल्या अग्रवाल जिनिंगजवळ रस्त्यावर एक पेट्रोल वाहतूक करणारा टँकर (एमएच २८, बी- ८७२९) उभा होता.

रत्यावर उभ्या असलेल्या टँकरचा दुचाकीवरील तरुणांना अंदाज आला नाही. यामुळे दुचाकी उभ्या टँकरवर पाठीमागून धडकली. यात सागर खैरे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने ठार झाला. तर पाठीमागे बसलेला त्याचा मित्र जखमी झाला.

माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बाबू मुंढे, ज्ञानेश्वर कायंदे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. अपघातानंतर रस्त्यावर वाहने उभी राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी नंतर वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, रात्रीच्या वेळी वाहने रस्त्यावर उभी करत असताना आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांची रुग्णालयात गर्दी

पघाताची माहिती मिळताच शुभम अन्वीकर, उपसरपंच दत्ता पारवे, भाऊसाहेब गाढवे यांच्यासह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती. सागर खैर हा अविवाहित होता. सागर खैरे व जखमी ज्ञानेश्वर जाधव जिवलग मित्र होते. या अपघातात मित्र ठार झाल्याने जखमी ज्ञानेश्वरला चांगलाच धक्का बसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT