Crime News : संबंधासाठी त्रास देणाऱ्या सरपंच पुतण्याचा माय-लेकाने केला शेवट File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : संबंधासाठी त्रास देणाऱ्या सरपंच पुतण्याचा माय-लेकाने केला शेवट

जामडी फॉरेस्टमधील हत्येचा ग्रामीण पोलिसांनी ८ दिवसांत लावला छडा

पुढारी वृत्तसेवा

A mother and son killed the sarpanch's nephew who was harassing them for a relationship

छत्रपती संभाजीनगर / कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जामडी फॉरेस्ट शिवारात १३ जानेवारी रोजी राजू रामचंद्र पवार (रा. जामडी) यांची निघृण हत्या झाली होती. या क्लिष्ट गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व कन्नड ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले आहे. दृश्यम चित्रपट आणि क्राईम वेबसिरीज पाहून पुराव्यांची विल्हेवाट लावणाऱ्या गावातीलच एका माय-लेकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गावातील सरपंचाच्या मृत राजू पवार पुतण्याकडून वारंवार होणाऱ्या संबंधांच्या मागणीला कंटाळून त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. वंदना राजू पवार (४५) आणि धीरज ऊर्फ टेमा राजू पवार (१८, दोघेही रा. जामडी फॉरेस्ट) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी बुधवारी (दि. २१) पत्रकार परिषदेत दिली. १३ जानेवारी रोजी जामडी फॉरेस्ट लगतच्या वनभागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.

पोलिसांनी तपास केला असता, तो मृतदेह राजू रामचंद्र पवार (रा. जामडी) यांचा असल्याचे निष्पन्न पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन आणि ग्रामीण पोलिसांचे एक अशी तीन पथके तैनात केली होती. मयत राजू पवार हा वंदना पवार यांच्याकडे वारंवार शारीरिक संबंधांची मागणी करून त्यांना त्रास होण्यासाठी वंदना यांनी मुलगा धीरजसोबत कट रचला. १३ जानेवारीला सकाळी राजूला शेतात बोलावले. तो झाडीत पोहोचताच धीरजने त्याच्या डोक्यात प्रहार केला, तर वंदना यांनी त्याचे गुप्तांग दाबून त्याचा जीव घेतला.

हा कठीण गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत आणि कन्नड ग्रामीणचे सपोनि रामचंद्र पवार, पवन इंगळे, सुधीर मोटे, उपनिरीक्षक महेश घुगे यांच्या पथकाने दिवस-रात्र एक केली.

चौकशीत माय-लेकाची स्टोरी परफेक्ट

वंदना पवार धीरज पवार सुरुवातीचे सात दिवस पोलिसांच्या हाती कोणतेही ठोस पुरावे लागत नव्हते. ५० हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली. अखेर, स्थानिक भाषेचे ज्ञान असलेल्या गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी माहिती काढली. घटनास्थळाजवळील शेत वंदना पवार यांचे असून, त्यांची चौकशी केली असता त्या माहिती लपवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर वंदना आणि धीरज दोघे माय-लेक एकच स्टोरी सांगून त्यावर ठाम राहत होते. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. धीरजने मी इकडे होतो, मी तिथे गेलोच नाही, लोकेशन चेक करा, आम्ही सोबत होतो असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्याने आईच्या मोबाईलचे सिमकार्ड स्वतःच्या मोबाईलमध्ये अगोदरच टाकून ठेवून तो मोबाईल वेगळ्या ठिकाणी अगोदर ठेवल्याने लोकेशन खुनाच्या ठिकाणचे येणार नाही याची त्याने काळजी घेतली होती. पोलिसी खाक्या दाखविताच वंदनाचे तोंड उघडले अन् तिने खुनाची कबुली दिली.

दृश्यम, क्राईम पेट्रोलचा प्रभाव

आरोपी धीरजने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम चित्रपट, सीआयडी आणि क्राईम पेट्रोलसारख्या मालिकांचा आधार घेतला होता. खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने अत्यंत नियोजनबद्ध आखणी केली होती. पोलिसांना तपासात अडथळा यावा म्हणून मृताची अंडरपैंट, चप्पल आणि फोडलेला मोबाईल वेगवेगळ्या दिशांना झुडपात आणि नाल्यात फेकून दिला.

मृतदेह सहजासहजी दिसू नये म्हणून तो वनभागातील एका नाल्यात झाडाच्या मुळाखाली लपवून ठेवला होता. जॅकेट काढून मृताच्या डोक्यावर बांधले. कुठेही रक्त पडू नये याची काळजी घेतली. विशेष म्हणजे हत्या नदीच्या कडेला केल्याने रक्त पाण्याने साफ करण्यात आरोपीना मदत झाली. मोबाईल ट्रेस होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची, खुनानंतर पुरावे कसे नष्ट करायचे अशी माहिती धीरजने इंटरनेटवर सर्च केल्याचेही उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT