Sambhajinagar News : खुनाच्या गुन्ह्यातील अल्पवयीनने तरुणाच्या गालात खुपसला चाकू  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News: 'तुझा शेवटचा दिवस आहे', वर्षभरापूर्वीच्या वादातून तरुणाच्या गालातच चाकू खुपसला

जुन्या वादातून तीन आरोपींचा दोघांवर जीवघेणा हल्ला

पुढारी वृत्तसेवा

A minor in the crime of murder stabs a young man in the cheek

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या वादातून खुनाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीसह तिघांनी दोघांवर जीवघेणा हल्ला चढविला. एका तरुणाच्या थेट गालातच चाकू खुपसून गंभीर जखमी केले. ही थरारक घटना रविवारी (दि. ३) रात्री नऊच्या सुमारास टॉऊन हॉल भागात घडली. विशाल पुसे, एक अनोळखी आणि विधीसंघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान यश सूर्यवंशी आणि बळराम दीपक जाधव (२०, रा. घाटी क्वॉर्टर बिल्डिंग) हे दोघे गंभीर जखमी झाले असून यशच्या गालात चाकू खपसल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

फिर्यादी बळराम जाधव याच्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो त्याचे मित्र यश आणि शारीक हे तिघे पाणचक्कीजवळ बोलत उभे होते. नऊच्या सुमारास यश आणि बळराम हे शारीकला टाऊन हॉलजवळील त्याच्या घरी सोडण्यासाठी गेले. तेथे खुनातील अल्पवयीन आर ोपीसह विशाल पुसे आणि एका अनोळखी आरोपीने राँग साईडने दुचाकीवर येत पुलाखाली तिघांना अडविले. जुन्या वादातून यश सूर्यवंशीला शिवीगाळ सुरू केली.

तुझा शेवटचा दिवस आहे, आज तुला मारून टाकतो म्हणत तिघांनी यशवर चाकूहल्ला केला. विधीसंघर्षग्रस्त आरोपीने चाकू काढून थेट यशच्या गालात ताकतीने खुपसला. तो चाकू त्याच्या गालातच रुतून बसल्याने यश रक्तबंबाळ होऊन को-सळला.

बळराम त्याला वाचवायला जाताच आरोपी विशाल पुसेने बळरामच्या मांडीत चाकू खुपसला. ते दोघेही गंभीर जखमी झाले. हा गोंधळ पाहून आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. लोकांना पाहून तिन्ही आरोपींनी दुचाकीने तेथून पसार झाले. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे करीत आहेत.

बेगमपुरा भागातील मुलाच्या खुनातील अल्पवयीन आरोपी

बेगमपुरा भागात क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोन मुलांच्या गटात चाकू, तलवारीने जीवघेणी हाणामारी झाली होती. त्या वादातून काही दिवसांनी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सुमित जावळे या १७ वर्षीय मुलाचा चाकूने गळ्याजवळ वार करून १५ जणांच्या टोळक्याने निघृण खून केला होता. यात अनेकजण अल्पवयीन आरोपी होते. त्यातीलच एका विधिसंघर्षग्रस्त आरोपीने दोन साथीदारांच्या मदतीने पुन्हा यश आणि बळराम या दोघांवर प्राणघातक हल्ला केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT