A magnificent sketch of Chhatrapati Sambhaji Maharaj will be created.
पैठण, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पैठण येथे आमदार विलास भुमरे प्रतिष्ठानच्यत्त वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
गुरुवारी (दि. १४) छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य रेखाचित्र काढण्यात येणार असून उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार असल्याची माहिती या प्रतिष्ठानचे कार्यवाहक शेखर शिंदे यांनी दिली आहे.
आमदार विलास भुमरे प्रतिष्ठान यांच्या वतीने संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी पाच वाजता नाथ महाराज समाधी मंदिर परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य रेखाचित्र उद्देश गोवर्धन पघळ यांच्या हस्ते साकारण्यात येणार आहे.
यावेळी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भुमरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार असल्याने यावेळी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार विलास भुमरे प्रतिष्ठान व शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.