Sambhajinagar Rain : विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट; परतीच्या पावसाचा शहरात धुमाकूळ  file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Rain : विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट; परतीच्या पावसाचा शहरात धुमाकूळ

सातारा, देवळाई, कोकणवाडीसह रेल्वेस्टेशन भागात ढगफुटीसदृश्य पाऊस

पुढारी वृत्तसेवा

A flash of lightning, thunder of clouds; The return of rain in the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वादळीवाऱ्यासह धुवांधार पावसाने शहरावर आक्रमण करत शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी अक्षरशः हाहाकार माजवला. सातारा, देवळाई. कोकणवाडी, रेल्वेस्टेशन परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. पावसाचे पाणी साचल्याने शिवाजीनगर भुयारी मार्ग पुन्हा तुंबल्याने नागरिकांचे हाल झाले, तर क्रांतीनगर परिसरात नाल्याची भिंत कोसळल्याने घरांमध्ये पाणी घुसले. रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले. झाडे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. सुमारे एक तासात १६.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

शहरासह परिसरात विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाटात वादळीवाऱ्यासह परतीच्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी चांगलेच झोडपून काढले. सातारा वसाहत, देवळाई, कोकणवाडी भागात सुमारे तासाभरात १६.६ मिमी इतका पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील नाले तुडुंब भरून वाहत होते. रेल्वेस्टेशन परिसरात तर प्रवाशांना चक्क गुडघाभर पाण्यातून रस्ता पार करावा लागला. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती वस्तूंचे नुकसान झाले. तर क्रांतीनगरातील एका नाल्याची भिंत पावसाच्या तडाख्याने कोसळली. त्यामुळे पाणी थेट घरांमध्ये शिरले. काही घरांमध्ये तर पलंग, कपाटे, भांडीकुंडी पूर्णतः भिजली.

तसेच शिव-ाजीनगर भुयारी मार्ग पुन्हा एकदा जलमय झाला. हा मार्ग शहरातील महत्त्वाचा दुवा असून, दरवेळी पावसात तो तुंबत असल्याने नागरिकांचे हाल होत असून, त्याच दृश्याची शुक्रवारी पुनरावृत्ती डाली. वाहनचालकांना पर्यायी मार्ग शोधावा लागला. अनेक दुचाकी, चारचाकी पाण्यात अडकून बंद पडल्या. नागरिकांचा प्रश्र आहे की, प्रत्येक वेळी हा मार्ग तुंबतो, पण त्यावर कायमस्वरूपी उपाय का होत नाही? नगरनाक्याजवळ पावसामुळे एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे काही तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ते झाड हटवण्याचे मनपाकडून रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. अचानक आलेल्या या पावसामुळे काही भागांत बीज पुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, हवामान विभागाने आज शनिवारीही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी बाहतुकीत झालेला विस्कळीतपणा, पाण्याचे तळे आणि खड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

>> पुढील २४ तासांत पुन्हा मुसळधार

पावसाचा जोर पाहता हवामान विभागाने पुढील २४ 1 तासांत पुन्हा मुसळधार सरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिका व आपत्कालीन यंत्रणाना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

>> या भागात साचले पाणी...

सातारा परिसरातील मुख्य गावठाण, उझणपूल, बोड बायपासवरील उन्नणपुला खालील, एमआयटी परिसर कैलास नगर, मोंढा, मारुती मंदिर परिसरातील सखल भाग, औषधी भवन, गोमटेश मार्केट, औरंगपुरा भाजी बाजार परिसर, घाटी, बायजीपुरा, दिवाण देवडी यासह पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम जिथे जिथे सुरू आहेत तिथे पैठण रोड, गोलवाडी, इटखेडा, कांचनवाडी या रस्त्यावरील पादचारी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

तासाभरात १६.६ मिमी पाऊस

▶▶ शहरात शुक्रवारी सांयकाळी सुमारे एक तासात १६. ६ मिमी

पाऊस पडल्याची नोंद झाली असून, कमाल ३०.७ अंश सेल्सिअस तर किमान २३.७ अंश सेल्सिअस तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT