Crime News : पोलिस ठाण्यातच नातेवाइकांमध्ये हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा Pudhari File photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : पोलिस ठाण्यातच नातेवाइकांमध्ये हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

मुलाच्या ताब्याबाबत वाद असल्याने पती-पत्नी तक्रार देण्यासाठी गेले होते.

पुढारी वृत्तसेवा

A fight broke out between relatives at the police station; a case has been registered against five people.

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा मुलाच्या ताब्याबाबत वाद असल्याने पती-पत्नी तक्रार देण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिस ठाण्यातच आपापसांत वाद घालून एकमेकांना मारहाण करणाऱ्या पाच नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुलदीपसिंग पाटील (रा. रांजणगाव) व त्यांची पत्नी मोनिका यांच्यात मुलाच्या ताब्याबाबत वाद असल्याने गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास दोघे एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते.

यावेळी डीओ अधिकारी विनोद अबुज हे त्यांची तक्रार ऐकून घेत असताना याठिकाणी आलेल्या निखिल पाटील, उमरावसिंग पाटील, मीना पाटील (सर्व रा. न्यू श्रीरामनगर, रांजणगाव), शीतल पाटील (रा. हर्मूल ) व उपासना देशमुख (रा. चाटे स्कूलजवळ, बीड बायपास) यांनी आपापसांत शाब्दक बाचाबाची करून एकमेकांना मारहाण सुरू केली.

पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, उपनिरीक्षक विनोद अबुज, महिला अंमलदार म्हस्के, तम्मलवाड, जमादार खान, बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, वाखुरे, गुसिंगे तसेच जाधव यांनी धाव घेत त्यांचे भांडण सोडविले. या प्रकरणी जामदार तुकाराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेश ठाकरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT