शेतामध्ये झाडाला गळफास घेत शेतकऱ्यांने संपवले जीवन File Photo
छत्रपती संभाजीनगर

सफियाबादवाडी येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

पुढारी वृत्तसेवा

शिऊर : वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडी येथील योगेश अप्पासाहेब जाधव (३५) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्यांने वडील अप्पासाहेब जाधव यांनी शनिवारी (ता. ५ ) रोजी शिऊर पोलीस ठाण्यात १ ऑक्टोबर रोजी योगेशने अहमदनगर येथे जातो म्हणून घराबाहेर पडल्याची व त्यानंतर घरी न आल्याने हरवल्याची नोंद केली होती.

मात्र, मंगळवारी (ता. ८) रोजी योगेश जाधव याने सोमवारी सफियाबादवाडी शिवारातील आपल्या शेत वस्ती जवळील बहिरोबावस्ती येथील शेतात येऊन झाडाला गळफास घेत जीवन संपवले. योगेश जाधव यांची एकूण आठ एकर शेती असून त्यापैकी पाच एकर वरील मक्का शेतात पाणी असल्याने मोठे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. यासह हात उसने व काही कर्ज घेतल्याची चर्चा आहे. शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन करण्यात येऊन दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश यांची आई आपल्या भावाकडे बाहेर गावी गेली होती. त्यामुळे घरी पत्नी, वडील व मुले होती. योगेश जाधव यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT