पोखरापूर : मोहोळ येथे गळफास घेवून विवाहितेने संपवले जीवन

अज्ञात कारणावरून पंख्याला गळफास घेऊन संपवले जीवन
The married woman ended her life journey by hanging herself at Mohol
मोहोळ येेथे विवाहितेने गळफास घेवून संपवली जीवन यात्राPudhari File Photo
Published on
Updated on

पोखरापूर, पुढारी वृत्तसेवा : मोहोळ शहरामध्ये न्यू समर्थ नगर परिसरात विवाहित महिलेने गळफास घेवून जिवन संपल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (दि.20) घडली. महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. श्वेता गणेश बचुटे (वय.23) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

The married woman ended her life journey by hanging herself at Mohol
नाशिक क्राईम : पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीची पोलीस स्थानकात गळफास घेऊन आत्महत्या

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश धनाजी बचुटे (रा. घाणेगाव ता. बार्शी) हे एमआयडीसी येथे कंपनीत कामाला आहेत. त्यामुळे ते पत्नी श्वेता आणि दोन मुलांसह मोहोळ शहरातील न्यू समर्थ नगर परिसरात भाडे तत्वावर राहत होते. शनिवारी (दि.20) गणेश याने श्वेताच्या मित्रामध्ये फोनवरून बाचाबाची झाली. यानंतर तो कामवर निघून गेला. दरम्यान काही कालावधीनंतर त्याने श्वेताला फोन केला होता. पण तिने तो उचलला नाही. यानंतर गणेशने घरी येऊन माहिती घेतली. तेव्हा श्वेताने बेडरूम मधील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेला दिसला. त्यानंतर तिला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करिता आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानुसार गणेश बचुटे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार घोळवे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news