Graduate constituency : पदवीधरसाठी ६२ उमेदवारांचे ९२ अर्ज दाखल file photo
छत्रपती संभाजीनगर

Graduate constituency : पदवीधरसाठी ६२ उमेदवारांचे ९२ अर्ज दाखल

तिरडीवर मिरवणूक, अपक्ष ५१, राजकीय पक्षांचे ११ उमेदवार

पुढारी वृत्तसेवा

92 applications filed by 62 candidates for the Graduate constituency

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने थेट तिरडीवर झोपून मिरवणूक काढली. उर्वरीत सर्वांनी नेहमीप्रमाणे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत येत उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ३५ जणांनी ५१ अर्ज दाखल केले होते. आतापर्यंत ६२ इच्छुकांचे ८२ अर्ज दाखल झाले असून यात राष्ट्रीय आणि राज्यस्तयरीय पक्षांच्या ११ उमेदवारांसह ५१ अपक्ष असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच इच्छुकांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्तालयासमोर गर्दी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात आणि प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

दुपारी ३ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे गट बंद करण्यात आले. तसेच जे उमेदवार गेटच्या आत होते. त्यांचेच उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आले. अगदी शेवटच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रतापसिंह पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, स्टंटबाजीसाठी नेहमीच प्रसिद्ध असलेले रमेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतांना देखील पुन्हा स्टंटबाजीच केली. उमेदवारी अर्ज दाखल करुन आल्यानंतर सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी रमेश पाटील यांनी आपल्या काही सहकारींसह तिरडीवर झोपून विभागीय आयुक्तालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला.

परंतु, अण्णाभाऊ साठे चौकातच त्यांना पोलिसांनी रोखले. पुढे जाऊ दिले नसल्याने तिरडीवरुन उतरून ते निघून गेले. यानंतर ३ वाजेपर्यंत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज बुधवारी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. यात पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर ९ आऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे.

तब्बल ५१ उमेदवार अपक्ष

६२ उमेदवारांनी ९२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात ११ उमेदवार हे विविध राजकीय पक्षांचे आहेत. त्यात काही उमेदवार हे नोंदणीकृत पक्षाचे असले तरी त्यांना राजकीय चिन्ह उपलब्ध नसल्याने ते अपक्षमध्येच मोडतात. तर तब्बल ५१ उमेदवार अपक्ष आहेत.

५ उमेदवारांचे प्रत्येकी ४ अर्ज

उमेदवारी अर्ज दाखल करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) सतीश चव्हाण यांनी ४ उमेदवारी दाखल केल्या आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रतापसिंह पाटील यांच्यासह अपक्ष उमेदवार अड अंबादास जाधव, संजीवनी टेकाळे, महा जनता परिवर्तन पार्टीचे कृष्णा पवार या पाच उमेदवारांनी प्रत्येकी ४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर एका उमेदवाराने ३ आणि १० उमेदवारींनी प्रत्येकी २ अर्ज दाखल केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT