Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात ६७ टक्के पाणीसाठा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात ६७ टक्के पाणीसाठा

पैठण येथील नाथसागर धरणात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

67 percent water storage in Jayakwadi Dam

पैठण, पुढारी वृत्तसेवा पैठण येथील नाथसागर धरणात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा झाला आहे. बुधवारी (दि.९) सायंकाळी सहा वाजेदरम्यान धरण नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार धरणातील पाण्याची टक्केवारी ६७ पर्यंत पोहोचली आहे.

सद्यस्थितीत वरील भागातील छोट्या-मोठ्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने येथील नाथसागर धरणात ५७ हजार ३६० पाण्याची आवक जमा होत असल्यामुळे सद्यस्थितीत पाण्याची ६६.३९ टक्केवारी नोंद झाली.

वरील धरणांतून सुरू असलेली पाण्याची आवक येथील नाथसागर धरणात येऊन जमा होण्यासाठी एक दिवस लागणार असल्याने पूर्ण पाण्याची आवक जमा झाल्यास ७० टक्के धरण भरण्यास विलंब लागणार नाही, अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.

गेल्या तीन दिवसांपासून पैठण तालुक्यातील सतत पाऊस पडत असल्याने सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. तालुक्यातील महसूल मंडळातील पैठण एकूण पाऊस २१६, पिंपळवाडी पि. २१७, बिडकीन २४५, ढोरकीन १८६, बालानगर २८१, नांदर २७४, आडुळ ३०३, पाचोड २२८, लोहगाव २४१, विहामांडवा १७४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

तालुक्यात आतापर्यंत एकूण २३६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. बुधवारी ४८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT