Organ Donation : ६६ वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीमुळे तिघांना नवे जीवन, दोन जणांना दृष्टी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Organ Donation : ६६ वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीमुळे तिघांना नवे जीवन, दोन जणांना दृष्टी

फुफ्फुस मुंबईला, तर यकृत, किडनीचे शहरातील रुग्णांमध्ये प्रत्यारोपण

पुढारी वृत्तसेवा

66-year-old brain-dead man gives new life to three, restores sight to two

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ब्रेन डेड झालेल्या बीड जिल्ह्यातील एका ६६ वर्षीय व्यक्तीमुळे एक-दोन नव्हे तर तीन जणांना नवे जीवन मिळाले. यातील फुफ्फुस मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे ग्रीन कॉरिडॉरने पाठवण्यात आले. तसेच किडनी आणि यकृताचे शहरातील गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. डोळे दान केल्याने दोन जणांना नवी दृष्टी मिळाली. केअर सिग्मा हॉस्पिटल्स येथे बुधवारी (दि.१) ही अवयव प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले.

याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील या ६६ वर्षीय व्यक्तींवर तेथील एका खासगी रुग्णालयात एंजोग्राफी आणि अँजोप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर रुग्णाची प्रकृती अचानक बिघडल्याने ब्रेन डेडच्या शक्यतेने मंगळवारी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. येथील डॉक्टरांनी तपासून रुग्णास ब्रेन डेड घोषित केले. हॉस्पिटलकडून रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात आले. अशा दुःखद परिस्थितीतही रुग्णाच्या नातेवाइकांच्या पुढाकारामुळे या ब्रेन डेड रुग्णाचे अवयवदानास सहमती दर्शवली.

त्यानुसार बुधवारी सकाळी ९ वाजता सिग्मा हॉस्पिटलमधील तज्ज्ञांच्या टीमकडून अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. दुपारी तब्बल अडीच वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. फुफ्फुस मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे, किडनी सिग्मा हॉस्पिटलमध्येच तर, यकृत बजाज हॉस्पिटल येथे प्रत्यारोपित करण्यात आले. तसेच रुग्णाचे डोळे (कॉर्निया) रिट्रिव्ह करून जतन करून ठेवण्यात आलेले आहे.

या तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये रुग्णालयाचे संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, रुग्णालय प्रमुख समीर पवार यांच्यासह डॉ. अभय महाजन, डॉ. संदीप बाथे, डॉ. प्रमोद अपसिंगकर, डॉ. विजय दौंडे, डॉ. प्रदीप सारूक, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. शरद बिरादार, डॉ. श्रेयस गुट्टे, डॉ. ज्ञानेश्वर झाडे, डॉ. प्रफुल जटाळे, डॉ. कपिल मुळे, डॉ. आनंद सोनी, डॉ. अँथोनी पाटोळे, विशाल नरवडे, धीरज तिवारी या सर्व तज्ज्ञांनी समन्वय साधून अवघड प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

अवयवदानातून नवजीवनाचा संकल्प अवयवदान हा केवळ वैद्यकीय उपचार नसून, तो सामाजिक बांधिलकीचाही भाग आहे. मृत्यूनंतरही अवयवदान करून अनेकांना जीवनदान देता येते. या प्रत्यारोपणामुळे अवयवदानाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. समाजातील नागरिकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा.
-डॉ. उन्मेष टाकळकर, संचालक, सिग्मा हॉस्पिटल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT