Chhatrapati Sambhajinagar : आदिवासी विकासच्या स्वयंम योजनेत बोगस विद्यार्थी दाखवून ६.५३ कोटींचा अपहार File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : आदिवासी विकासच्या स्वयंम योजनेत बोगस विद्यार्थी दाखवून ६.५३ कोटींचा अपहार

चार महाविद्यालयांच्या प्राचार्यांसह १७ जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

6.53 crores embezzled by showing bogus students in the Swayam Yojana for tribal development

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेत चार महाविद्यालयांतील प्राचार्य, लिपिकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, लिपिकाशी संगनमत करून १ हजार ४१६ बोगस विद्यार्थी दाखवून शासनाचे तब्बल ६ कोटी ५३ लाख १६ हजार ५० रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २०२२ ते ३१ मार्च २०२५ या काळात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प - कार्यालय, गजाजन महाराज मंदिर रोड येथे घडला. चार महाविद्यालयांच्या प्राचार्यांसह १७ जणांविरुद्ध पुंडलिकनगर क पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२९) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चेतना दौलत मोरे (५२) या सध्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेज, एपीजे अब्दुल कलाम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे लिपिक यांनी आर्थिक फसवणूक केल्याचे चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न झाले. तसेच चेतना शिक्षण संस्थेचे कला महाविद्यालय, सावंगी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांनीही आर्थिक अफरातफर केली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी गुन्हा दाखल करून घेत आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मोहसीन सय्यद करत आहेत.

घोटाळा उघड करणारा तक्रारदारही आरोपी

२०२३-२४ व २४-२५ या वर्षात महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे बनावट कागदपत्रे सादर करून योजनेत आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार संदीप रामदास गवळे (रा. हळदा, ता. सोयगाव) याने प्रकल्प अधिकाऱ्याकडे केली होती. त्यावरून चौकशी समिती स्थापन झाली. चौकशीत स्वयंम योजनेत ऑनलाईन बनावट विद्यार्थी संख्या दाखवून अनुदान लाटल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे घोटाळा उघड करणारा संदीपही लाभार्थी असल्याने त्यालाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

अशी आहेत अपहार करणाऱ्या आरोपींची नावे सहारा शिक्षण संस्थेअंतर्गत चालणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेजचे प्राचार्य सय्यद अरशद अफसर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आर्टस्, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य खलील पठाण, लिपिक महेश रघुनाथ पाडळे, समीर शामीर पठाण व इतर संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच सावंगी बायपास रोडवरील चेतना शिक्षण संस्थेचे कला वरिष्ठ महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य, संबंधित कर्मचारी व इतर, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी, लिपिक अविनाश मुर्दे, बनावट लाभार्थी संदीप रामदास गवळे, परमेश्वर अशोक सोनवणे, राहुल नंदू साळवे, रवींद्र नंदू साळवे, कैलास श्रीपत गवळे, पल्लवी कैलास गवळे, महेश रघुनाथ पाडळे, स्वाती रघुनाथ पाडळे व इतर, मध्यस्थी एजंट अशी आरोपींची नावे आहेत.

काय आहे योजना... : या योजनेत आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी

व ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी अनुसूचित जमातीच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास व शौक्षणिक साहित्यासाठी आधार संलग्न बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यात येते. मनपा हद्दीत भोजनासाठी २८ हजार, निवास भत्ता १५ हजार, निर्वाह भत्ता ८ हजार असे एकूण ५१ हजार प्रतिवर्ष प्रतिविद्यार्थी खर्च दिला जातो.कोणी किती रक्कम लाटली.

१) डॉ. एपीजे अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेजने २०२२ ते २०२५ या काळात एकूण ५४९ विद्यार्थी दाखवून २ कोटी ६९ लाख ६९ हजार ६५० रुपये लाटले.

२) डॉ. एपीजे अब्दुल कलाम आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेजने २०२२ ते २०२५ या काळात एकूण ५३४ बोगस विद्यार्थी दाखवून २ कोटी ५८ लाख ८८ हजार ६५० रुपये लाटले.

३) चेतना शिक्षण संस्थेच्या कला वरिष्ठ महाविद्यालयाने २०२२ ते २०२५ या काळात एकूण २८५ बोगस विद्यार्थी दाख-वून १ कोटी १७ लाख ३१ हजार रुपये लाटले.

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाने २०२४ ते २०२५ या काळात ४८ बोगस विद्यार्थी दाखवून ७ लाख २६ हजार १५० रुपयांचा अपहार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT