Sambhajinagar News : जिल्ह्याचे ६०६ मंडळाधिकारी, तलाठी आज एकाच छताखाली file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : जिल्ह्याचे ६०६ मंडळाधिकारी, तलाठी आज एकाच छताखाली

जिल्हाधिकारी गौडा घेणार आढावा, प्रलंबित कामांचा होणार निपटारा

पुढारी वृत्तसेवा

606 Mandal Officers and Talathis from the district under one roof today

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महसूल विभागातील प्रलंबित कामांचा निपटारा आणि ऑनलाइन नोंदींची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंडळाधिकारी आणि तलाठ्यांची जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बैठक आयोजित केली आहे. बुधवारी (दि. २६) वंदे मातरम् सभागृहात होणाऱ्या या बैठकीत जिल्ह्यातील ८९ मंडळाधिकारी आणि ५१७ तलाठी असे एकूण ६०६ अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असून यात वर्ग २ च्या सरकारी जमिनींच्या आऑनलाईन नोंदी देखील पूर्ण केल्या जाणार आहेत. यावेळी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजात अनेक महत्त्वाच्या नोंदी आणि प्रक्रिया प्रलंबित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून या बैठकीत सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. घोषणापत्रांच्या आधारे होणारे फेरफार, वर्ग-२ जमिनींचे व्यवहार आणि त्यासंबंधीच्या महसुली नोंदींचीही तपासणी केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्व मंडळाधिकारी आणि तलाठ्यांना एकाच ठिकाणी बोलावून त्यांच्या कामकाजाचा थेट आढावा घेतला जाणार असल्याने प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी कोणत्या सूचना देतात, याकडे महसूल यंत्रणेचे लक्ष लागले आहे. कामातील दिरंगाई, नोंदींमधील त्रुटी आणि अपूर्ण कामांबाबत संबंधितांना कानपिचक्या मिळण्याची शक्यता आहे.

या कामांचा समावेश

प्रलंबित पीक पाहणी, अॅग्रिस्टॅक नोंदणी, ई-फेरफार तसेच वर्ग-२ च्या शासकीय जमिनींची माहिती संकलित करून ती ऑनलाइन करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT