Sambhajinagar News : वाहन दुरुस्ती, उद्यानांसह साहित्य खरेदीचा पावणे पाच कोटींचा प्रस्ताव

स्थायी समितीसमोर सादर : सफाई कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठी ३५ लाख
Sambhajinagar News
Sambhajinagar News : वाहन दुरुस्ती, उद्यानांसह साहित्य खरेदीचा पावणे पाच कोटींचा प्रस्तावfile photo
Published on: 
Updated on: 

Proposal worth Rs 4.75 crore for vehicle repairs and procurement of materials, including items for parks

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या विविध विभागांतील वाहनांची देखभाल-दुरुस्ती, उद्यानांचा विकास व देखभाल, कार्यालयीन लेखन साहित्य आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या गणवेश खरेदीसाठी तब्बल ४ कोटी ८३ लाख २८ हजार ६९५ रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. गुरुवारी (दि.२६) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

Sambhajinagar News
सौंदर्याला विज्ञानाची जोड ! लेझर हेअर रिडक्शनचे वाढते महत्त्व : डॉ. आसावरी टाकळकर

महापालिका प्रशासनाने वाहनांची देखभाल-दुरुस्ती, उद्यानांचा विकास व देखभाल, कार्यालयीन लेखन साहित्य आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या गणवेश खरेदीसाठी सुमारे पावणे पाच कोटींचा प्रस्ताव मजुरीसाठी गुरूवारच्या स्थायी समिती सभेसमोर ठेवला आहे. यात यांत्रिकी विभागातील वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

अग्निशमन विभागातील फायर वॉटर टेंडर, रेस्क्यू टेंडर, क्चिक रिस्पॉन्स वाहने, अग्निशमन वाहने, ट्रेलर पंप व पोर्टेबल पंपांच्या दुरुस्तीसाठी ३२ लाख रुपये प्रस्तावित आहेत. यांत्रिकी विभागातील ३७ महिंद्रा, मारुती व टाटा वाहनांसाठी ४५ लाख, ६८ ट्रक, टिपर, हुकलोडर आदी वाहनांसाठी ४५ लाख, १२ बॅकहो लोडर व पाच पोकलेनसाठी ५० लाख, २० जेटिंग मशीनसाठी ४० लाख, तर २४२ इतर वाहनांच्या ऑटो इलेक्ट्रिक दुरुस्तीसाठी ४० लाख रुपये प्रस्तावित आहेत. वेल्डिंग व टायर पंक्चर युनिटच्या साहित्य खरेदीसाठी ५० लाखांची तरतूद आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar Crime News : राहुल चाबुकस्वार टोळीची दहशत कायम; प्लॉटसाठी १५ लाखांची मागणी

दरम्यान, प्रभाग क्रमांक १३ मधील कुशीनारा सोसायटी येथील उद्यान विकासासाठी ४२ लाख ९५ हजार ९८० रुपये, तर प्रमुख उद्याने वगळून अन्य उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ४९ लाख ७९ हजार ६७० रुपये प्रस्तावित आहेत. कार्यालयीन लेखन साहित्यासाठी ५० लाख, तर वर्ग चारमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या गणवेश खरेदीसाठी ३५ लाख ३६ हजार १५८ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अग्निशमन साहित्याचाही समावेश

अग्निशमन विभागाच्या वाहनांसह ट्रेलर पंप आणि पोर्टेबल पंपांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्चही प्रस्तावात समाविष्ट आहे. आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या अग्निशमन व बचाव यंत्रणेची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठीही तरतूद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.