50 members of a cattle smuggling syndicate on police radar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गोवंशांची अवैध तस्करी आणि कत्तल करणाऱ्या आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारी सिंडिकेटविरोधात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कडक पावले उचलली आहेत. या रॅकेटमधील ९ अट्टल आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर न्यायालयाने प्रमुख आर-ोपींच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.
दरम्यान, गोवंश कत्तलीचा हा गोरखधंदा करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यांतील तब्बल ५० बड्या तस्करांची यादीच पोलिसांनी तयार केली असून, पोलिस पाठीशी लागताच हे सर्व जण भूमिगत झाले आहेत. यामध्ये जुन्या शहरातील काही स्थानिक पुढाऱ्यांची कुंडलीच भक्कम पुराव्यांसह पोलिसांच्या हाती लागल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बायजीपुरा परिसरातील दातवस्तीत छापा टाकून पोलिसांनी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १३१ गोवंशांची सुटका केली होती. याप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे एक आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारीचे जाळे असल्याचे निष्पन्न झाले. आर्थिक फायद्यासाठी चालणाऱ्या या रॅकेटचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या टोळीवर मोक्का लावण्यास मंजुरी दिली.
या टोळीतील जुबेर शफिक कुरेशी (टोळी प्रमुख), मोहसिन कुरेशी, मोहम्मद समीर कुरेशी, मुजीब ऊर्फ मुजाहि कुरेशी, शेख कय्यूम कुरेशी, सलीम कुरेशी, वसीम शकी कुरेशी, काजी कलीम अहमद आणि शेख रऊफ या ९ आन ोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्यात एकू १४ आरोपी निष्पन्न झाले असून, उर्वरित आरोपींच् अटकेसाठी पथके रवाना झाली आहेत. तसेच, नायगाव येथ अटक केलेला इम्रान हा जालना व अहिल्यानगरमधून गोवं पुरवणारा मुख्य सप्लायर असल्याचे समोर आले आहे दरम्यान, शहरातील विनापरवाना मटण दुकानांना मनपाच् कोणत्या अधिकाऱ्यांचे अभय आहे, याचीही चौक पोलिसांकडून केली जात आहे.
आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी
या आंतरजिल्हा टोळीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व स्वतः पोलिस आयुक्त करत आहेत. यात उपायुक्त प्रशांत मोहिते, पंकज अतुलकर, रत्नाकर नवले, सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत, सागर देशमुख, निरीक्षक गजानन कल्याणकर आणि सोमनाथ जाधव यांचा समावेश असून, आयुक्त दररोज तपासाचा आढावा घेत आहेत.