4600 EVMs will be required for the municipal corporation elections in Sambhaji Nagar.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेच्या 29 प्रभागातील 115 वॉर्डांच्या निवडणुकीसाठी 1264 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. ज्या प्रभागात 30 च्या आत उमेदवार आहेत. तेथे 3 तर ज्या प्रभागात 40 हून अधिक उमेदवार आहेत, तेथे 4 मतदान यंत्र लागणार असल्याने सर्वच मतदान केंद्रांसाठी सुमारे 4 हजार 600 बॅलेट युनिट लागणार आहेत. तर 1506 कंट्रोल युनिट लागतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
निवडणूक कार्यालयनिहाय यंत्र
निवडणूक कार्यालय- 1 मध्ये 235 कंट्रोल युनिट तर 764 बॅलेट युनिट लागणार आहे. तर मतदान कार्यालय 2 मध्ये 141 कंट्रोल युनिट, 393 बॅलेट युनिट, निवडणूक कार्यालय 3 मध्ये 193 कंट्रोल युनिट, 533 बॅलेट युनिट, निवडणूक कार्यालय 4 मध्ये 152 कंट्रोल युनिट, 558 बॅलेट युनिट, निवडणूक कार्यालय 6 मध्ये 127 कंट्रोल युनिट, महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यासह माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
त्यामुळे आता सर्वच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. शहरातील 29 प्रभागांतील 115 नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत असून त्यासाठी 859 उमेदवार नशिब अजमावित आहेत. यंदा महापालिकेची निवडणूक प्रभागनिहाय होत आहे.
यात एका प्रभागात सुमारे 28 हजार ते 45 हजार मतदार आहे. त्यानुसार मतदान केंद्र तयार करण्यात आले असून 900 मतदारांचा एक मतदान केंद्र याप्रमाणे 11 लाख 18 हजार 283 मतदारांसाठी 1264 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. यात काही प्रभागात 30 च्या आत उमेदवार असल्याने 3 काही ठिकाणी 40 हून अधिक उमेदवार असल्याने तेथे 4 बॅलेट युनिट आणि 1 कंट्रोल युनिट तर चारहून अधिक बॅलेट युनिट झाल्यास तेथे दोन कंट्रोल युनिट लागते, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.