41-foot 'green' Ganesha emerges from 45-foot tree
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : 'कुलस्वामिनी प्रतिष्ठान' च्या वतीने यंदा निसर्गाचे महत्त्व पटवून देणारा ४५ फुटी उंच झाडातून प्रगटलेला ४१ फुटी इको ग्रीन गणेशा चा देखावा साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या २० हजार रुपयांच्या अत्यल्प खर्चात आणि पूर्णपणे टाकाऊ व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून हा देखावा उभारण्यात आला आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या देखाव्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. सुमारे ३०० बांबूंच्या कामट्यांचा वापर करून ४१ फुटी सोनेरी रंगाची आकर्षक 'ग्रीन गणेश' मूर्ती, ४५ फुटी उंच झाडामध्ये विराजमान करण्यात आली आहे.
यासोबतच २०० फुट बाय ५ फूटी टाकाऊ कारपेटचा वापर करून १२ फूट उंच व ४० फूट लांब डोंगर-दऱ्यांच्या रांगा तयार केल्या आहेत. डोंगरामधून वाहणारा पाण्याचा खळाळता झरा खालील १० फुटी कृत्रिम शेततळ्यात साचताना दिसतो, जो उपस्थितांचे लक्ष वेधून घेईल.
या देखाव्याची संकल्पना कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांची असून, देखावा निर्मितीसाठी कार्याध्यक्ष अविराज कोरडे, अलका कोरडे, संजय राठोड, लता अनिल गावंडे, सविता अच्युत कुलकर्णी, प्रल्हाद गायकवाड, ज्ञानेश्वर सागरे, नथुराम नरवाडे, सचिन जोहरे व मजहर मंडीवाला यांनी सलग तीन आठवडे विशेष परिश्रम घेतले.
देखाव्यातील मुख्य आकर्षणे आणि सामाजिक संदेश
झाड वाचवा संदेश
५ फुटी बाल-गणेश २५ फुट वृक्षाला आलिंगन देत 'वृक्षसंवर्धनाचा' संदेश देत आहे. तसेच
पृथ्वी रक्षण
कृत्रिम शेततळ्यात ४ फुटी बाल-गणेश पृथ्वी सोबत निसर्गाचे रक्षण करण्याचे आवाहन करत आहे.
प्राणिमात्र दया
५ फुटी बाल-गणेश २५ फुट वृक्षाला आलिंगन देत 'वृक्षसंवर्धनाचा' संदेश देत आहे. तसेच
पृथ्वी रक्षण
कृत्रिम शेततळ्यात ४ फुटी बाल-गणेश पृथ्वी सोबत निसर्गाचे रक्षण करण्याचे आवाहन करत आहे.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी १२ फुटी उंच गाय आणि वासरू तसेच पाण्यातील कासव, हरीण, बगळा, मोर इत्यादी प्राणी पक्षी यांची मूर्ती उभारून मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यात आला आहे. इको-फ्रेंडली विसर्जनः या गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तीचाच वापर करावा आणि मूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदांमध्येच करावे, असे आवाहन करण्यात आले. मंडळाची शाडू मूर्तीही याच कृत्रिम तळ्यात विसर्जित केली जाणार आहे-
वापरलेले टाकाऊ व पर्यावरणपूरक वापरलेले साहित्य
देखाव्यातील मुख्य आकर्षणे आणि सामाजिक संदेश झाड वाचवा संदेश
प्राणिमात्र दया
५ फुटी बाल-गणेश २५ फुट वृक्षाला आलिंगन देत 'वृक्षसंवर्धनाचा' संदेश देत आहे. तसेच
पृथ्वी रक्षण
कृत्रिम शेततळ्यात ४ फुटी बाल-गणेश पृथ्वी सोबत निसर्गाचे रक्षण करण्याचे आवाहन करत आहे.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी १२ फुटी उंच गाय आणि वासरू तसेच पाण्यातील कासव, हरीण, बगळा, मोर इत्यादी प्राणी पक्षी यांची मूर्ती उभारून मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यात आला आहे. इको-फ्रेंडली विसर्जनः या गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तीचाच वापर करावा आणि मूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदांमध्येच करावे, असे आवाहन करण्यात आले. मंडळाची शाडू मूर्तीही याच कृत्रिम तळ्यात विसर्जित केली जाणार आहे.
४ ते ६ फुटी ३०० बांबू कामट्या, ५० किलो काथ्या रस्सी, ५० लाकडी बल्ली, २००४५ फूट टाकाऊ कारपेट, ३ बॅग सिमेंट आणि १५ लिटर नैसर्गिक रंग वापरले आहेत.