Crime News : तरुणावर जीवघेणा हल्ला; पोटात चाकू खुपसला, डोक्यात हाणला सिमेंटचा गट्टू

टीव्ही सेंटर भागातील घटना; तिघांविरुद्ध सिडको पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News
Crime News : तरुणावर जीवघेणा हल्ला; पोटात चाकू खुपसला, डोक्यात हाणला सिमेंटचा गट्टूfile photo
Published on
Updated on

deadly attack youth stabbed hit cement block

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जाधववाडी सिसलजवळ मध्यरात्री एका तरुणावर तिघांनी चाकू आणि सिमेंटच्या गट्टने जीवघेणा हल्ला केला. दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी काहीही कारण नसताना शिवीगाळ करत तरुणाच्या पोटात चाकू खुपसला आणि डोक्यात सिमेंटचा गट्ट मारून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.१६) रात्री १२:४० वाजता घडली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Bogus Students : बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान लाटले

रोहन गांगे, रोहित गांगे आणि त्यांचा एक अनोळखी मित्र (सर्व रा. जाधववाडी) अशी आरोपींची नावे आहेत. गंभीर जखमी फिर्यादी आकाश श्रीकांत ठोंबरे (२९, रा. ऑडिटर सोसायटी, मयूर पार्कमधील) याच्या तक्रारीनुसार, हा सिडकोतील एका मेडिकलमध्ये नोकरी करतो.

मंगळवारी (दि. १५) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास आकाश आणि त्याचा मित्र रोहन ठाकूर हे दोघे टीव्ही सेंटरवरून दुचाकीने घरी परतत होते. ते जाधववाडी सिग्नलजवळील शरद हॉटेलसमोर आले असता, रस्त्यावर ओळखीचे रोहन गांगे, रोहित गांगे आणि त्यांचा एक अनोळखी मित्र उभे असलेले त्यांना दिसले.

रोहितने आवाज दिल्याने आकाशने दुचाकी थांबवली. त्यावेळी आरोपी रोहन गांगे याने आकाशला शिवीगाळ सुरू केली. ते तिघेही दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आल्याने आकाशने तेथून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहनने जवळ येत, मला ओळखत नाही का? असे म्हणत आकाशच्या कानाखाली मारली.

Crime News
Peacock : पक्षाघात झालेला मोर उपचाराने सावरला

आकाशचा मित्र रोहन ठाकूर याने प्रतिकार करत आरडाओरडा केल्याने तिघे पळून गेले. रक्तबंबाळ आकाशला गस्तीवर पोलिसांनी आणि आकाशच्या मित्रांनी तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.

याला आज संपवून टाकू...

रोहित आणि रोहन गांगे यांनी याला आज संपवून टाकू असे म्हणत हल्ला चढवला. रोहनने चाकू काढून आकाशच्या पोटात खुपसला. त्याचवेळी रोहित आणि त्यांच्या अनोळखी मित्राने रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्ट उचलून आकाशच्या डोक्यात आणि कपाळावर मारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news