BisiCon Conference : घाटीत बिसिकॉन परिषदेनिमित्त येणार देशभरातील ३५० डॉक्टर्स File Photo
छत्रपती संभाजीनगर

BisiCon Conference : घाटीत बिसिकॉन परिषदेनिमित्त येणार देशभरातील ३५० डॉक्टर्स

पूर्व तयारीसाठी तंत्रज्ञांची कार्यशाळा

पुढारी वृत्तसेवा

350 doctors from across the country will come to the Ghati for the BisiCon conference

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घाटीत यंदा बिसिकॉन २५ (ब्रेस्ट इमॅजिंग सिस्टम ऑफ इंडिया कॉन्फरन्स) या राष्ट्रीय परिषद `चा मान मिळाला आहे. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान ही परिषद होणार असून, यात ३०० ते ३५० डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. स्क्रिनिंग टू सव्र्हायव्हल ही या परिषदेची थीम आहे.

ब्रेस्ट इमेजिंग सोसायटी ऑफ इंडियाच्या या १२ व्या परिषदेनिमित्त रविवारी (दि.२६) घाटीत क्ष किरणशास्त्र विभागातर्फे तंत्रज्ञांसाठी स्किल अपग्रेडशन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या सहसंचालक डॉ. शिल्पा दोमकुंडवार, घाटी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे, डॉ. अंजली वासडीकर, डॉ. राजेंद्र कलंत्री, डॉ. मेघा वाणी, डॉ. अजय वरे, डॉ. सोनाली साबू, डॉ. कोंडकर यांच्या उपस्थित झाले.

यावेळी ६० पेक्षा या परिषदेत भारतासह विविध देशांतील तज्ज्ञही सहभागी होणार आहेत. मॅपिंग ऑफ ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग इन इंडिया यावर एक पॅनल चर्चा होईल. यातील चर्चेअंती समोर येणारे मुद्दे गाइडलाइन म्हणून वापरले जातील. परिषदेत नवीन संशोधन, उपचार पद्धती, शस्त्रक्रिया, स्तन कर्करोगाचे योग्य निदान यासाठी उपलब्ध वैद्यकीय चिकित्सा यंत्रणा, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा योग्य वापर आदींबाबत मार्गदर्शन व चर्चासत्र होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT